लातूर दि. ०३- रेणापूर तालुक्यातील मौजे गरसुळी येथील काँग्रेस पक्षाचे सरपंच यांच्यासह विविध आजी-माजी लोकप्रतिनिधी व इतर अनेक जणांनी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वात रविवारी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत झालेल्या या भाजपा पक्ष प्रवेश सोहळ्यास मंडळ अध्यक्ष शरद दरेकर, बाबासाहेब घुले, अनिल भिसे, श्रीमंत नागरगोजे, दिनकर राठोड, संतोष चव्हाण, धनंजय पवार, नारायण राठोड, उत्तम चव्हाण, रमेश चव्हाण यांच्यासह इतर अनेकांची उपस्थिती होती.
यावेळी आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत गरसुळी येथील सरपंच अजय राठोड, माजी सरपंच तथा ग्राप सदस्य वाल्मीक घोडके, श्रीहरी बुवनर, संजय राठोड, सोसायटीचे सदस्य लहू घोडके, शेषेराव राठोड, वृषीकेत चव्हाण, भागवत कातळे, उत्तम कांबळे, वैजनाथ घोडके, प्रशांत चव्हाण, रामराव राठोड, नामदेव गुरुजी राठोड, विजय राठोड, लक्ष्मण चव्हाण, राजाभाऊ राठोड, कृष्णा राठोड, किशन घोडके, रुपेश घोडके, रामदास घोडके, बालासाहेब घोडके, शंकर घोडके, नागनाथ घोडके, अच्युत सरवदे, बालाजी चव्हाण, बाळासाहेब घोडके, हरीपाल घोडके, अंतराम चव्हाण, गोविंद सोमवंशी, नवनाथ वैद्य, बळीराम चव्हाण, मधुकर घोडके यांच्यासह इतर अनेकांनी भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केला.
ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही अशी ग्वाही देऊन यावेळी बोलताना आमदार रमेशआप्पा कराड म्हणाले की, देशात नरेंद्रजी आणि राज्यात देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातील शासनाने सर्वसामान्य माणसासाठी विविध योजना सुरू करून त्याचा प्रत्यक्ष लाभ देण्याचे काम केले आहे. लातूर ग्रामीण मतदार संघातील गावागावात वाडी वस्तीत शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून लाखो नव्हे तर कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून विकास कामांना गती दिली असून गरसुळी गावच्या विकासाला निधीची कमतरता पडू देणार नाही असेही त्यांनी बोलून दाखवले.
प्रारंभी मंडल अध्यक्ष शरद दरेकर, सरपंच अजय राठोड, वृषीकेत चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले तर शेवटी संतोष चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी गरसुळी ग्रामस्थांच्या वतीने आ. कराड यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गरसुळी येथील भाजपाचे माजी सरपंच कुंडलिक घोडके, विठ्ठल गरड, धनंजय साळुंखे, तंटामुक्तीचे अध्यक्ष अरुण कातळे, प्रकाश राठोड, दिलीप कातळे, चंद्रकांत चव्हाण, नवनाथ चव्हाण, अनंत राठोड, ज्ञानदेव घोडके, बालासाहेब घोडके यांच्यासह इतर अनेक जण होते.

Post a Comment
0 Comments