लातूर/उदगीर /करकरे अंबादास
दैनिक लोकमत माध्यम समूहाच्या वतीने दिला जाणारा ‘महाराष्ट्ररत्न’ हा मनाचा पुरस्कार अर्थात सन्मान आज लंडन येथे अतिशय सन्मानाने मला बहाल करण्यात आला. हे सांगताना मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटत आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्या सामाजिक आणि राजकीय कार्याची पावती असून, ही सगळी ऊर्जा मला माझ्या जनतेच्या आशीर्वादातून आणि पाठबळातून मिळाली आहे. माझ्या कार्याला एवढ्या मोठ्या व्यासपीठावर गौरव मिळणे, हा माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी आणि अविस्मरणीय क्षण आहे. त्यामुळे दैनिक लोकमत माध्यम समूहाचे मन:पूर्वक आभार!
हा पुरस्कार केवळ माझा एकट्याचा नाही, तर माझ्या मतदारसंघातील जनतेचा, माझ्या प्रत्येक सहकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा आणि माझ्या कुटुंबाचा आहे. तसेच त्यामागे माझ्या जनतेचा विश्वास आणि सहकार्य हीच खरी शक्ती आहे. लोकांच्या प्रश्नांना आपले मानून त्यावर उपाय शोधणं हेच माझं ध्येय राहिलं आहे आणि यापुढेही कायम राहील. हे सुध्दा यानिमित्ताने नमूद करतो. कारण, माझ्यासाठी उदगीर-जळकोट विधानसभा हा केवळ मतदारसंघ नसून माझे कुटुंबच आहे. म्हणून मी त्या कुटुंबाचा प्रमुख आहे. परिणामी, माझे माझ्या माय-बाप जनतेशी प्रेमाचे, आपुलकीचे आणि विश्वासाचे नाते आहे.
लोकमतसारख्या प्रतिष्ठीत माध्यम समूहाने दिलेला हा सन्मान मला अधिक जबाबदारीची जाणीव करून देतो. त्यामुळे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन. तसेच सर्वांगीण विकासाच्या या यशस्वी वाटचालीत नवनवीन संकल्प, प्रकल्प आणि योजनांचा समावेश करून त्यांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी सुध्दा मी कटिबद्ध आहे. शिवाय, शिक्षण, आरोग्य, शेती, आणि रोजगार या क्षेत्रात सुध्दा उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी मी कायम तत्पर राहीन, अशी यानिमित्ताने ग्वाही देतो. तसेच दैनिक लोकमत माध्यम समूहाच्या वतीने दिला गेलेला ‘महाराष्ट्ररत्न’ हा पुरस्कार अतिशय विनम्रपणे आणि कृतज्ञतापूर्वक माझ्या उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघातील माय-बाप जनतेला समर्पित करतो. कारण, त्यांच्या निस्वार्थी प्रेमामुळे, पाठिंब्यामुळे आणि आशीर्वादामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो आहे. याची मला कायम जाणीव आहे.

Post a Comment
0 Comments