Type Here to Get Search Results !

*-जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर*

लातूर /अंबादास करकरे 

लातूर शहरात आज दिनांक 30.08.2025 रोजी साधारणपणे दुपारी  1.45 ते 2.00 वाजेदरम्यान मोठा आवाज होऊन जमीन हादरल्याची माहिती प्राप्त झाली होती. तथापि यासंदर्भात राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र नवी दिल्ली येथे सदरील माहिती देऊन चौकशी करण्यात आली असता भूकंपाची नोंद झाली नसल्याचे त्यांचेकडून कळविण्यात आले आहे. मागील तीन तासाचा सिस्मोलॉजिकल डेटा तपासण्यात आला असल्याचे त्यांनी कळवले आहे. लातूर शहर व जिल्हावासियांना याद्वारे आवाहन करण्यात येते की आपण घाबरू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये.


Post a Comment

0 Comments