Ak 24 Crime News August 12, 2025
अंबादास करकरे/लातूर
लातूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे मंजुरी मिळालेल्या ७५ फूट उंच अशा "स्टॅच्यु ऑफ नॉलेज" या भव्य पुतळ्यासाठी आणखीन १० कोटी वाढीव निधी मिळावा व काम लवकरात लवकर सुरू करावे तसेच लातूरच्या हक्काचे जिल्हा रुग्णालयाचे ही काम सुरू करावे आणि लातूर मधील काही प्रसिद्ध शिक्षण संस्थामध्ये बोगस पद्धतीने शिक्षक भरती केली आहे ती रोखण्यात यावे अशा मागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस हे लातूर दौऱ्यावर आले असता VS पँथर संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
लातूर मधील समस्त आंबेडकरी जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि स्वाभिमानाचा विषय म्हणजे "स्टॅच्यु ऑफ नॉलेज" या ७५ फुटी पुतळ्यासाठी अनेक राजकीय षडयंत्र झाले होते. पण शेवटी मंजुरी मिळाली आणि १० कोटी रुपये निधी मंजूर झाले. पण हे १० कोटी रुपयांचा निधी पुरेसे नाहीत गेल्या वर्षी २४ ऑगस्ट रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या हस्ते माती परीक्षण केले गेले. पण ७५ फुटी "स्टॅच्यु ऑफ नॉलेज" च्या उभारणीसाठी मंजूर झालेले १० कोटी रुपयांचे निधी अपुरे पडणार आहे. कारण माती परीक्षण आणि पाया भरणी मधेच हे बजेट संपुष्टात येईल अशी माहिती मनपाचे माजी आयुक्त मनोहरे यांनी दिले होते.
या संबंधी गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची पुण्यात भेट घेऊन आणखीन १० कोटी रुपयांचे निधी मंजूर करावे असे निवेदन विनोद खटके यांनी VS. पँथर संघटने तर्फे दिले होते. आणि परत एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले असता याच विषयावर निवेदन देण्यात आले.
दुसरं महत्त्वाचे निवेदन म्हणजे लातूरच्या जनतेला हक्काचं जिल्हा शासकीय रुग्णालय मंजुरी मिळावी म्हणून माझं लातूर परिवार व लातूरच्या अनेक संघटनानी पुढाकार घेतला आणि जिल्हा शासकीय रुग्णालयास परवानगी मिळावी अशी मागणी होती. आणि निधी ही मंजूर झाला परंतु आणखीन ही शासकीय रुग्णालयाच्या कामाची सुरूवात झालेली नाही ही शोकांतिका आहे. शासकीय रुग्णालयाचे काम हे लवकरात लवकर सुरू करावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन ही दिले की ७५ "फुटी स्टॅच्यु ऑफ नॉलेज" साठी १० कोटी रुपयांचा निधी आणि लातूरचे हक्काचं जिल्हा शासकीय रुग्णालयाचे काम लवकरात सुरू होईल व काही प्रसिध्द शिक्षण संस्थेमध्ये चुकीच्या पद्धतीने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती करण्यात आले आहे ते रद्द करून पवित्र पोर्टल मार्फत नव्याने कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. यावेळी निलंगा मतदार संघाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, लातूर ग्रामीणचे आमदार कराड, उदगीर चे आमदार संजय बनसोडे यांची ही भेट घेऊन चर्चा करण्यात आली. आणि या वेळी संघटनेचे अध्यक्ष विनोद खटके, मार्गदर्शक संतोष मांदळे, रवि कुरील, जिल्हाध्यक्ष शरद किणीकर, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील कांबळे, पंकज शिंदे, गिरीश पवार सह अनेक कार्यकर्ते उपस्थि
त होते.

Post a Comment
0 Comments