Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी दर्जेदार शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडवावे - आ. कराड रेणापूर तालुक्‍यातील २१ शिक्षकांना आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या हस्‍ते आदर्श शिक्षक पुरस्‍कार वितरण


लातूर/ अंबादास करकरे 

लातूर - शिक्षण क्षेत्र पवित्र असले पाहिजे, जिल्हा परिषदेच्या शाळा या गोरगरिबाचे वैभव असून याच शाळेतून शिकलेले अनेकजण देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले आहेत तेव्हा स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांचे उज्वल भवितव्य घडवावे असे प्रतिपादन लातूर ग्रामीणचे आमदार  रमेशआप्पा कराड यांनी केले.

रेणापूर तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने २१ जणांना तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण आणि विविध क्रीडा स्पर्धेतील सन्मान सोहळा आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते मंगळवारी रेणापूर पं.स. सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी सुमित जाधव हे होते तर याप्रसंगी रेणापूरचे तहसीलदार सागर मुळीक, गटशिक्षणाधिकारी कृष्णा भराडीया, तालुका आरोग्य अधिकारी श्रीधर रेड्डी, भाजपाचे विक्रमकाका शिंदे, नवनाथ भोसले, अनिल भिसे, सतीश आंबेकर, दशरथ सरवदे, सिद्धेश्वर मामडगे, गोपाळ पडि‍ले, संपत कराड, लक्ष्मण यादव, भाऊसाहेब गुळबिले, अनुसया फड, निवृत्ती लहाने आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

चांगल्या कामाची पावती हिच मिळालेल्या पुरस्कारातून प्राप्त होते. सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, देशाचे भवितव्य शिक्षकांच्या हाती असते विद्यार्थ्यांना कोणते संस्कार देणार त्यानुसार विद्यार्थी घडतात. आई-वडिलांपेक्षाही अधिक संस्कार करणारे शिक्षक हेच विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचे गुरु असून ज्या घरात ज्या शाळेत चांगले संस्कार मिळतात त्या ठिकाणी निश्चितच प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. तेव्हा शिक्षकांनी कर्तव्यात कसूर न करता, कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणे कर्तव्य केल्यास निश्चितपणे चांगली पिढी घडल्याशिवाय राहत नाही असे बोलून दाखवले.

बऱ्याच शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद आहे. अनेक ठिकाणी शिक्षक दोन आणि विद्यार्थी पाच अशी स्थिती आहे. ही परिस्थिती बदलावी लागेल. काही ठिकाणी शाळा बंद पडत आहेत यासाठी शिक्षकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असून जिल्हा परिषद शाळेची गळती थांबली पाहिजे. शिक्षकाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहीजे त्यासाठी शिक्षकांनी स्वतःला आचारसंहिता घालून कर्तव्यनिष्ठ काम करायला हवे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रासाठी जे जे लागेल ती मदत करण्यास आपण सदैव तयार आहोत असेही आ. रमेशआप्पा कराड यांनी बोलून दाखवले.

रेणापूर तालुक्यातील गावागावातील प्रत्येक शैक्षणिक प्रगतीच्‍या कार्यात आ. रमेशआप्पा कराड सतत सहभागी असतात त्यांनी कर्मचारी खेळाडूंना प्रोत्साहन दिले मदत केली असे सांगून गटविकास अधिकारी सुमित जाधव यांनी रेणापूर पंचायत समितीच्या लोकाभिमुख कामकाजाची माहिती दिली. तर शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष गोपाळ पडि‍ले आणि पुरस्कार प्राप्त शिक्षक भाऊसाहेब भामरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष मोगरगे यांनी केले.यावेळी आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते रेणापूर तालुक्यातील विद्या अंकुश, विजय माळी, अनिल राठोड भाग्यश्री चव्हाण, रंजना पुरी, कैलास कुरुंद, रमेश जगताप, यशवंत कोयाडे, शेख जाकीर, हनुमंत मुंडे, रावसाहेब भांबरे, शीला पलमटे, श्रीधर वांगे, हनुमंत सोळंके, अरुण चव्हाण, मालन त्रिमुखे, भागवत जाधवर, छाया सदाफुले, शिवाजी शिरसाट, आलिया बुऱ्हाण, शुभम कांबळे या शिक्षकांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तर कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय ग्रामीण क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल कबड्डी आणि खो-खो संघांचा तसेच वैयक्तिक विविध स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचा सत्कार करून गौरव करण्यात आला. कार्यक्रमास रेणापुर तालुक्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, आदर्श शिक्षक, त्यांचे कुटुंब, कर्मचारी अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments