लातूर /
अंबादास करकरे
लातूर राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाचे विभागीय उप-आयुक्त बी. एच. तडवी यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर जिल्हयाचे अधीक्षक केशव गो. राऊत. राउशु, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष गुन्हा अन्वेषणाच्या मोहिमेच्या अनुषंगाने दि. १२/९/२०२५ ते दि. १४/९/२०२५ कालावधीमध्ये लातूर जिल्हयात अवैध मद्य धाब्यांवरील मद्यविक्रीविरोधात अथवा धाब्यांवर मद्यप्राशन करणा-यांविरोधात तसेच अवैध मद्य निर्मिती/विक्री/वाहतूक विरोधात लातूर, उदगीर, निलंगा, चाकूर विभाग यांनी संयुक्तरित्या विशेष मोहिम राबवून एकूण २२ गुन्हे नोंद करण्यात आले. यात २९ आरोपींना अटक करण्यात आली. सदर गुन्हयामध्ये हातभट्टी दारु ३५ लि., देशी ५६ लि., विदेशी दारु ५ लि., बिअर २४ ली, ताडी-५० ली, असा एकूण रु. ४७,३२५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त. करण्यात आला. विशेष म्हणजे वरिष्ठांच्या आदेशान्वये धाबा चालक हे अवैधमार्गाने दारु विक्री अथवा दारुसेवन करण्यास परवानगी देतात, त्याविरुध्द विशेष कलमान्वये कार्यवाही केली आहे.
सदरच्या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, केशव राऊत, उप अधीक्षक एम. जी. मुपडे, निरीक्षक आर. एस. कोतवाल, वि. ओ. मनाळे, आर. व्हीः कडवे, श्रीमती यु. व्ही. मिसाळ, दुय्यम निरीक्षक आर. डी. भोसले, एन. टी, रोटे, एस. आर. राठोड, एस. के. वाघमारे, बी. आर. वाघमोडे, आर. एम. माकोडे, व्हि. पी. राठोड, एस. डी. घुले, एस. पी. काळे, श्रीमती डी.डी. साळवी, बी. एच. आशमोड, एस. पी. मळगे, विजय पवार, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले जान - सौरभ पाटवदकर, शेन्नेवाड, प्रथमेश फत्तेपुरे, विशाल सुडके, गिरी, भरत गायकवाड, बळी साखरे, ऋषि चिंचोलीकर, शैलेश गड़डीमे, हणमंत माने, हसुले, वडवळे, शितल पवार यांनी सहभाग नोंदविला.
अवैध मद्यविक्री, अवैध धंदे व वाहतूकी विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार असून, तसेच धाब्यांवर बसुन मद्यसेवन करीत असलेल्या तसेच धाबामालकांना यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार आहे नागरीकांनी अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक ८४२२००११३३ या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नांव गुप्त ठेवले जाईल असे केशव राऊत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, लातूर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment
0 Comments