लातूर /अंबादास करकरे
लातूर, दि. २७ : अतिवृष्टीमुळे अहमदपूर तालुक्यातील चिलखा येथे अडकलेल्या चार मजुरांची आज दुपारी १२:५० वाजता प्रशासनाने सुखरूप सुटका केली. या कार्यात राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी वैयक्तिक लक्ष घालून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. घटनेची माहिती मिळताच सहकार मंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याशी संपर्क साधून बचाव पथकाला तातडीने घटनास्थळी रवाना केले. स्वतः पावसात चिलखा येथे पोहोचून मा. पाटील यांनी मजूर सुखरूप बाहेर येईपर्यंत घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवले.
आज पहाटे ५ वाजेपासून अडकलेल्या मजुरांना प्रशासनाने यशस्वीपणे बाहेर काढले. या कार्यात उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर, पोलीस निरीक्षक भुसनर यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments