संत गोपाळबुवा महाराज साखर कारखान्याचा पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ
शेतकरी हेच दैवत समजून श्री.संत गुपाळबुवा सारख कारखाना
शेतकऱ्यांना न्याय, स्थैर्य आणि स्वाभिमान देणार- आ. कराड
लातूर दि. ०३- थोर विभूती आणि संत महात्म्यांचा आशीर्वाद असल्याने श्री. संत गोपाळबुवा महाराज साखर कारखाना अल्पावधीत निश्चितपणे भरभराटीस येईल. या कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी हेच दैवत समजून शेतकऱ्यांना स्थैर्य, स्वाभिमान आणि न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशअप्पा कराड यांनी लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर - जवळा परिसरात उभारण्यात आलेल्या श्री संत गोपाळबुवा महाराज साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या हिताची जपणूक व्हावी यासाठी लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर - जवळा परिसरात उभारण्यात आलेल्या श्री संत गोपाळ बुवा महाराज शुगर अँड अँग्रौ इंडस्ट्रीज प्रा. लि. रामेश्वर या साखर कारखान्याचा पहिला चाचणी गळित हंगामाचा शुभारंभ विजयादशमीच्या दिवशी गुरुवार रोजी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष हभप गहीनीनाथ महाराज औसेकर, प.पु. विद्यानंद सागर महाराज गातेगावकर, हभप नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरीकर, हभप बाबा महाराज बोराडे काटगावकर आणि हभप लालासाहेब महाराज देवळेकर यांच्या शुभहस्ते आणि लातूर ग्रामीणचे आ. रमेशआप्पा कराड, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अँड. बळवंतराव जाधव, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष नाथसिंह देशमुख, अंबाजोगाई साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन दत्तात्र्यआबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून मोठ्या उत्साहाच्या वातावरणात करण्यात आला.
याप्रसंगी संत गोपाळबुवा महाराज साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक तुळशीराम अण्णा कराड, चेअरमन राजेश कराड, अंबाजोगाई कारखान्याचे माजी चेअरमन ओम प्रकाश गोडभरले, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, प्रदीप पाटील खंडापूरकर, भागवत सोट, ऋषिकेश कराड, रणवीर कराड, पृथ्वीराज कराड, नवनाथ भोसले, अनिल भिसे, रविकांत औसेकर, बन्सी भिसे, पद्माकर चिंचोलकर, सुरज शिंदे, महेंद्र गोडभरले, उद्धव काळे, प्रताप पाटील, गोविंद नरहरे, अनंत चव्हाण, गोपाळ पाटील, भैरवनाथ पिसाळ, दशरथ सरवदे, साहेबराव मुळे, विजय काळे, बाबा भिसे, बालाजी दुटाळ, बालासाहेब कदम यांच्यासह कारखाना उभारणी ठेकेदार बस्वराज बर्गे, फॅब्रिकेशनचे ठेकेदार शहाजी ढोगे आणि कारखाना उभारणी इंजिनियर सुनील बिराजदार व इतर अनेकांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. या स्वप्नपूर्ती कार्यक्रमास कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी सभासद मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
गेली पंचेवीस वर्ष मी माझ्या राजकीय सामाजिक जीवनात पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या स्वाभिमानासाठी संघर्ष केला, न्याय हक्कासाठी लढलो यामुळेच आपण मला मोठा आशीर्वाद देऊन विधानसभेत पाठवले लातूर ग्रामीण मतदार संघात नवी क्रांती घडवली याचा मला सार्थ अभिमान असल्याचे सांगून यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, शेतकऱ्यांचे अश्रू पुसावेत त्यांना आधार देता यावा यासाठी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या मनातील स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न मातीशी जुळलेल्या कराड कुटुंबीयांनी संत गोपाळ बुवा महाराज साखर कारखान्याची उभारणी करून संकल्प पूर्ण केला आहे.
गेली अनेक वर्ष ऊस उत्पादक शंतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची आडवणूक, पिळवणूक होत होती आम्ही उघडया डोळयांनी पाहत होतो हातात कांहीच नसल्याने काहीही करु शकत नव्हतो. छोटा का असेना पण शेतकऱ्यांच्या हक्काचा संत गोपळबुवा साखर कारखाना उभा राहीला. कारखान्याच्या प्रशासनाने व्यवसाय म्हणून कारखाना चालवत असताना काटेकोर, काटकसरीने कारभार करावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा असेही आ. कराड यांनी बोलून दाखविले.
याप्रसंगी गहिनीनाथ महाराज औसेकर, विद्यानंद सागर महाराज, नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरीकर, बाबा महाराज बोराडे यांनी कराड कुटुंबीयांची समाज हिताच्या विविध कार्याची माहिती देऊन शेतकऱ्यांना सशक्त करण्याचे काम कराड परिवाराने हाती घेतले आहे निश्चितच हा प्रकल्प यशस्वी होईल असे आशीर्वाद दिले. तर बळवंतराव जाधव आणि नाथसिंह देशमुख यांनी कराड कुटुंबीयांच्या साखर कारखान्याच्या उभारणीमुळे मांजरा परिवाराच्या साखर कारखान्यांना गाळपापूर्वीच भाव जाहीर करावा लागला असल्याचे सांगून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे असे बोलून दाखवले.
कारखान्याचे चेअरमन राजेश कराड यांनी पैसा कमवण्यासाठी अथवा राजकारण करण्यासाठी कारखान्याची उभारणी केली नाही तर शेतकऱ्यांना योग्य भाव, उसाचे अचूक वजन, मान सन्मान देण्यासाठी संत गोपाळ बुवा महाराज साखर कारखान्याची उभारणी केली असून या कारखान्यात कसलेही राजकारण नाही तर केवळ शेतकरी हितच असेल असे आपल्या प्रास्ताविकातून बोलून दाखवले. शेवटी सर्व उपस्थितांचे ऋषिकेशदादा कराड यांनी आभार व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले. प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांचा कारखान्याच्या वतीने यथोचित सत्कार करून स्वागत करण्यात आले या गळीत हंगाम शुभारंभास लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ऊस उत्पादक, शेतकरी सभासद, भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments