लातूर /प्रतिनिधी
अंबादास करकरे
लातूर जिल्ह्यातील मुरुड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्री होत असल्याची चर्चा होत होती. दरम्यान लातूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाशी संलग्न असलेले शिवाजी भगवान पाटील मूळ नेमणूक मुरुड पोलीस स्टेशन यांनी यासंदर्भात माहिती काढून, आरोपी सादिक यासीन तांबोळी (वय 40 वर्ष व्यवसाय सादिक पान स्टॉल राहणार तूकाई नगर, मुरुड ता. जि. लातूर) यांच्याकडून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू सुपारी व सुगंधित तंबाखू असे एकूण 13384 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरील माल तू कुठून मिळवला? असे विचारले असता त्याने सांगितले की, सोहेल तांबोळी (रा. शिराढोण ता. कळंब जि धाराशिव) यांच्या दुकानातून आपण हा माल आणल्याचे सांगितले. त्यावरून दोन्ही आरोपीच्या विरुद्ध मुरुड पोलीस स्टेशन येथे गुरंन 342 /25 कलम 123 223,274,275 ,3(5) भारतीय न्याय संहिता व कलम 59 अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदर्भात पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, आरोपी क्रमांक एक यांनी आरोपी क्रमांक दोन याच्या दुकानातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित तंबाखू सुपारी खरेदी करून अवैध पद्धतीने विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचे आढळून आल्यावरून वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. सदरील प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे हे करत आहेत.
Post a Comment
0 Comments