Type Here to Get Search Results !

*मुंबई, ठाणे व पुणे येथुन तिन अपहरत मुलींचा शाध घेण्यात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षास यश...*


लातूर /अंबादास करकरे 

लातूर जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झाल्याची तक्रार देण्यात आली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, तीन अल्पवयीन मुलींना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लाऊन पळवून नेले वरुन अनुक्रमे पोलीस स्टेशन गांधी चौक, औराद शहाजानी व एम.आय.डी.सी येथे गुन्हे दाखल होते. पोलीस स्टेशन गांधी चौक गुरनं. 219/2022 कलम 363,366 (अ), 109 भादंवि. प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयामध्ये मागील 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासुन पोलीस स्टेशन कडुन पिडीत मुलीचा शोध सुरु होता. पोलीस स्टेशन एमआयडीसी गुरनं. 478/2023 कलम 363,366 भादंवि. व पोलीस स्टेशन औराद शहाजानी गुरनं. 45/2025 कलम 137 (2) भा.न्या.सं. प्रमाणे संबंधीत पो.स्टे. येथे गुन्हे दाखल होते.

            पोलीस अधीक्षक अमोल तांबे नमूद गुन्ह्यांचा आढावा घेऊन अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडुन वरील दाखल असलेल्या तिनही गुन्हयांचा समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडुन समांतर तपासात गोपनिय माहिती व तांत्रीक माहिती संकलीत करुन त्याच्या विश्लषणाचे अधारे तिनही गुन्हयातील पिडीत मुली व आरोपी हे पुणे मुंबई व ठाणे येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन AHTU टीम दिनांक 08/10/2025 ते 11/10/2025 रोजी दरम्यान मुंबई, ठाणे व पुणे येथे जावुन तिनही गुन्हयातील अपहरत पिडीत मुलींचा व आरोपींचा शोध घेण्यात AHTU टीम यश मिळाले आहे. पोलीस स्टेशन गांधी चौक, लातूर येथे दाखल असलेल्या गुन्हयातील पिडीत मुलगी भवानी नगर, भिवंडी जि.ठाणे येथे मिळुन आली आहे. व पोलीस स्टेशन औराद शहाजानी येथे दाखल असलेल्या गुन्हयातील पिडीत मुलगी व आरोपीस रामनगर, कांदिवली (पश्चिम), मुंबई येथे मिळुन आले आहेत. तसेच पोलीस स्टेशन एमआयडीसी येथे दाखल असलेल्या गुन्हयातील पिडीत मुलगी व आरोपीस फर्गुसन कॉलेज पुणे समोरुन येथे मिळुन आले आहेत. सदर अपहरत पिडीत मुलीना व आरोपींना संबंधीत पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.

            सदरची कारवाई भा. पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद तिडेके पोलीस अंमलदार सदानंद योगी, प्रकाश जाधव, सुधामती यादव (वंगे), लता गिरी, निहाल मनियार यांचे पथकाने पार पाडली आहे.

Post a Comment

0 Comments