Type Here to Get Search Results !

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण



अंबादास करकरे / 

लातूर जिल्हा परिषद परिसरात उभारण्यात आलेल्या लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. याकार्यक्रम प्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार विक्रम काळे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार धनंजय मुंडे, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, आमदार संजय केणेकर, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महापालिका आयुक्त श्रीमती मानसी यांची उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमस्थळी भारतीय संविधानाची प्रत देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तसेच पुतळ्याच्या नामफलकाचे अनावरण त्यांनी केले.

माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या जिल्हा परिषद परिसरातील पुतळ्यासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. जिल्हा परिषदेच्यावतीने उभारण्यात आलेल्या लोकनेते  स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पुतळ्याची उंची १४ फूट असून कांस्य (ब्राँझ) धातुने बनविलेला हा पुतळा ९०० किलो वजनाचा आहे. ३४५१.५६  चौ.मी. जागेत पुतळा उभारण्यात आला आहे. या परिसरात सुशोभिकरण व आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. शिल्पकार विजय बोंदर व अंबादास पायघन यांनी पुतळा तयार केला.  कार्यक्रम प्रसंगी अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments