लातूर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवार, 11 ऑगस्ट 2025 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या लातूर जिल्हा परिषद परिसरात उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11.20 वाजता लातूर विमानतळावर आगमन होईल. सकाळी 11.45 वाजता ते लातूर जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे लातूर जिल्हा विकास कामासंदर्भात अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करतील. दुपारी 12.50 वाजता त्यांच्या हस्ते लातूर जिल्हा परिषद येथील लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होईल. दुपारी 1.15 वाजता दयानंद महाविद्यालय मैदान येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 2.55 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
Post a Comment
0 Comments