Type Here to Get Search Results !

लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

 


लातूर दि.०८- लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या प्रांगणात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते व इतर अनेक महायुतीतील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि ११ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे नेते आ. श्री. रमेशआप्पा कराड यांनी दिली. महाराष्ट्राचे लोकनेते माजी केंद्रीय ग्रामविकासमंत्री स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा पूर्णकृती पुतळा लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्यालय इमारत परिसरात उभारण्यात आला असून शासकीय जागेत मुंडे साहेबांचा लातूर येथे बसवण्यात आलेला पुतळा कदाचित राज्यातील पहिलाच असेल अशी माहिती देऊन भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, भव्य दिव्य उभारण्यात आलेल्या या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण येत्या सोमवार दि ११ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे. पुतळा अनावरणाचा जाहीर कार्यक्रम दयानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या अनावरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे राहणार आहेत. तर याप्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, राज्याच्या पर्यावरणमंत्री ना. पंकजाताई मुंडे, सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील, माजी कृषीमंत्री आ. धनंजयजी मुंडे, माजी युवक कल्याण व क्रीडामंत्री आ. संजय बनसोडे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, औश्याचे आमदार अभिमन्यू पवार, मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे अध्यक्ष गोविंदअण्णा केंद्रे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, भाजप नेत्या अर्चनाताई पाटील चाकूरकर, शिवसेना संपर्कप्रमुख अँड बळवंतराव जाधव, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अफसर शेख, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, रिपाई जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांच्यासह महायुतीचे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पुतळा अनावरणाचा भव्‍य दिव्‍य सोहळा होत असून या कार्यक्रमास जिल्हाभरातील भाजपासह महायुतीतील सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर मुंडे साहेबावर प्रेम करणाऱ्या सर्व स्थरातील नागरिकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असेही आवाहन भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी केले आहे.



Post a Comment

0 Comments