उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर येथील धडाडीचे युवा नेता राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा भारतीय दलित पँथरचे प्रदेश उपाध्यक्ष, उदगीर नगरपालिकेचे माजी नियोजन व विकास सभापती निवृत्तीराव सांगावे यांना नुकताच देश पातळीवरील अल्पसंख्यांक परिषदेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय समाजसेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार युवा नेत्याला मिळाल्याबद्दल माजी जिल्हाधिकारी भाई नगराळे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य समोसे यांनी त्यांचे कौतुक करून त्यांचा सन्मान केला आहे.
निवृत्तीराव सांगावे यांना क्रांती दिनाचे औचित्य साधून 9 ऑगस्ट रोजी दिल्ली येथील संविधान भवन येथे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन, खा. भाई चंद्रशेखर आझाद, खा. वर्षाताई गायकवाड यांच्यासह देशभरातील अनेक विद्वान आणि चुकीच्या रूढी परंपरेच्या विरोधात लढा उभारणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य समारंभात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
उदगीर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी राहून देश पातळीवरील पुरस्कार मिळाल्याबद्द भाई नगराळे यांनी युवा नेते निवृत्तीराव सांगावे यांचे कौतुक करून लहान वयातच दलित मुस्लिम ऐक्य परिषदेच्या निमित्ताने एक मोठे संघटन उभारून उपेक्षित समाजाला न्याय मिळाला पाहिजे, या दृष्टीने सामाजिक कार्य उभारून इतर तरुणांना आदर्श दिला आहे. तो आदर्श समाजातील अनेक तरुणांनी घ्यावा, आणि समाजकार्याला वेळ द्यावा. असे आवाहन याप्रसंगी भाई नगराळे यांनी केले आहे.
या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना निवृत्तीराव सांगावे म्हणाले की, संघटनेतून काम करत असताना माझ्या असंख्य कार्यकर्त्यांनी मला साथ दिली. त्यामुळे मला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील लढा लढता आला. गोरगरिबांना आणि उपेक्षित समाजाला न्याय देता आला. याचा मला मनस्वी आनंद होत आहे. या पुरस्काराने माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, ही जाणीव सतत माझ्या मनामध्ये निर्माण करणारा आणि समाजकार्याला ऊर्जा देणारा हा पुरस्कार आहे, असे सांगितले.

Post a Comment
0 Comments