लातूर/अंबादास करकरे
लातूर जिल्ह्याचे सुपुत्र चाकूर तालूक्यातील मौजे घरणी येथील व्यंकटेश धनंजय केंचे याची भारतीय हॉकी संघात युरोप दौऱ्यासाठी निवड झाली या यशाबद्दल भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी त्यांचा यथोचित सत्कार करून अभिनंदन केले व हॉकी स्पर्धेत यशस्वी होऊन लातूर बरोबरच देशाचेही नाव उंचवावे अशा शुभेच्छा दिल्या. चाकूर तालुक्यातील मौजे घरणी येथील व्यंकटेश धनंजय केंचे यांनी राष्ट्रीय पातळीवरील हॉकीच्या सामन्यात दमदार प्रदर्शन केल्याने त्यांची भारतीय हॉकी संघात निवड झाली ही निवड केवळ चाकूर तालुक्यासाठीच नव्हे तर लातूर जिल्ह्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. येत्या काळात दिं ८ जुलै २०२६ ते दिं २० जुलै २०२६ दरम्यान १३ दिवसांचा युरोप दौरा आहे. या दौऱ्यात व्यंकटेश केंचे हा आयर्लंड, नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स आणि अर्जेंटिना येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. लातूर ग्रामीणचे आमदार तथा भाजप नेते श्री रमेशआप्पा कराड यांनी व्यंकटेश केंचे यांचा यथोचित सत्कार करून या निवडीबद्दल अभिनंदन केले व हॉकी स्पर्धेत यशस्वी होऊन लातूर बरोबरच देशाचेही नाव उंचवावे अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी मुलाचे वडील धनंजय केंचे, आई स्वर्णा केंचे, आजी कांताबाई केंचे, चुलते विजय केंचे, चुलती लताबाई केंचे, लहान भाऊ गणेश केंचे, त्याचबरोबर भाजपाचे वसंत करमुडे, डॉ. बाबासाहेब घुले, रामराव मोरे, गोविंदराव घुले, भाऊसाहेब गुळबिले, लक्ष्मण खलंग्रे यांच्यासह अनेक जण होते.
.jpeg)

Post a Comment
0 Comments