Type Here to Get Search Results !

*गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आणखीन एक सराईत गुन्हेगार लातूर जिल्ह्यातून हद्दपार. उत्सव काळात शांतता अबाधित राखणेकरिता पोलिसांची कारवाई.*

लातूर/अंबादास करकरे 

जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची (तडीपार) कारवाई करण्यात येत असून पोलीस ठाणे अहमदपूर हद्दीतील इसम *ऋषिकेश उर्फ बंटी बालाजी हंगे राहणार अंबाजोगाई रोड अहमदपूर.* असे आहे.

             त्यांच्यावर सन 2018 ते 2025 कालावधीमध्ये मारामारी करण्याचे, धमकी देणे शरीराविषयी गंभीर गुन्हे खुनाचा प्रयत्न सार्वजनिक मालमत्तेस नुकसान अशासारखे अनेक गुन्हे दाखल असून लोकांससोबत किरकोळ कारणावरुन हाणामारी करुन दहशत निर्माण करणेच्या सवयीचा असून त्याचे वर्तनामुळे आगामी काळात राज्यात जिल्हायात शहरात जयंती, उत्सव, सण, निवडणुका मध्ये विघ्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने  *ऋषिकेश उर्फ बंटी बालाजी हंगे राहणार अंबाजोगाई रोड अहमदपूर.*  यास लातूर  जिल्हायातुन एका वर्षाकरिता हद्दपार (तडीपार) करण्यात आले आहे .

                यासंदर्भात पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी अहमदपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिराप्पा भुसनूर यांनी नमूद आरोपी विरुद्ध उपविभागीय दंडाधिकारी, अहमदपूर  डॉ. मंजुषा लटपटे यांच्याकडे हद्दपारचा प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्यासंदर्भात आदेशित केले होते. त्यावरून अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी,अहमदपूर  अरविंद रायबोले यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे अहमदपूर चे पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर यांनी नमूद आरोपी विरुद्ध सविस्तर हद्दपारचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी अहमदपूर यांचे कार्यालयात सुनावणी अंति नमूद आरोपीस मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56(ब)अन्वये एक वर्षा करिता लातूर जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्यात आले आहे.

           आगामी काळात साजरे होणारे सण-उत्सव व येणारे काळात होऊ घातलेल्या निवडणुकांचे अनुषंगाने त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (ब) प्रमाणे कार्यवाही करून  सदर सराईत गुन्हेगाराला लातूर जिल्ह्यातून एक वर्षा करिता हद्दपार करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments