Type Here to Get Search Results !

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याची उत्कृष्ट कामगिरी गुटख्याची विक्री भरली धसकी ! तब्बल १२लाख ६१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त!



उदगीर/अंबादास करकरे 

उदगीर तालुक्यात अनेक वेळा प्रसिद्धी माध्यमातून अवैधरीत्या वाहतूक करून गुटख्याची विक्री होत असल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण आणि उदगीर चे विभागीय पोलीस अधीक्षक गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या गुन्हे प्रटीकरण शाखेचे रामभाऊ बनसोडे, नामदेव चेवले,सचिन नाडागुडे, राजकुमार बडेटवार, राजू देवडे,पो.चालक अभिजीत लोखंडे यांच्या पथकाने पोलीस उपनिरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यावर गस्त वाढवण्यात आणि बीदर,भालकी,कमालनगर, या कर्नाटक राज्यातून उदगीर शहरात आणि लातूर जिल्ह्यात विक्री करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने प्रतिबंध घातलेल्या सुगंधी तंबाकूची बेकायदेशीररित्या वाहतूक करतांना पोलिसांनी इर्टिगा कारसह एकास रंगेहात पकडले.त्याच्याकडून तब्बल १२ लाख ६१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उदगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

२४ ऑगष्ट रोजी रात्री अकरा वाजेला बिदर-उदगीर रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोलपंपा समोर ही कारवाई झाली.यासंदर्भात नामदेव संतराम चेवले या ठाणे अंमलदाराने दिलेल्या फिर्यादी नुसार एक संशयास्पद इरटीगा कार (क्र.एमएच १३ बी एन ०९१२) तपासणी केली असता या कारमध्ये नोबा ऊर्फ माऊली मारोती गादेकर (वय ४७ वर्षे) रा. अकोली (ता.गंगाखेड,जि. परभणी) याने वेगवेगळ्या १८ पोत्यामध्ये प्लास्टिकच्या ७२ पिशव्यामधून केसरयुक्त विमल पान मसाला बेकायदेशीरपणे वाहून नेण्याचा प्रयत्न चालविल्याचे उघड झाले. 

या बेकायदेशीर तंबाकूची किंमत जवळपास चार लाख ४९ हजार २८० रुपये आहे.तंबाखु किंग नाव असलेल्या एका प्लॅस्टीकच्या छोटया पिशवीत प्रत्येकी ३० रूपये किमतीच्या तीन हजार ७४४ पुड्या आढळल्या.त्यांची  

किंमत एक लाख १२ हजार ३२० रूपये आहे.पोलिसांनी या कारवाईत सात लाख रुपये किमतीची इर्टिगा कार व पाच लाख ६१ हजार ६०० रुपये किमतीची तंबाकू अशा सुमारे १२ लाख ६१ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लोखंडे हे करीत आहेत.


Post a Comment

0 Comments