Type Here to Get Search Results !

*बँकेमध्ये पैसे भरायला गेलेल्या ग्राहकाचे पैसे चोरणाऱ्या आरोपीला अवघ्या काही तासातच चोरलेल्या पैशासह पोलिसांनी केली अटक*



लातूर/अंबादास करकरे 

दिनांक 25 ऑगस्ट रोजी मजगे नगर लातूर येथील एका बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या ग्राहकाचे स्लिप भरत असतांना बाजुला ठेवलेली 90 हजार रुपये ची रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने नजर चुकवून चोरुन घेवुन गेल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे गांधी चौक येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस ठाणे गांधी चौक येथील पोलीस अधिकारी व अंमलदारांना तात्काळ आरोपींचा शोध घेणेबाबत सूचना पोलीस अधिक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधिक्षक मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी केल्या. वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सुनिल रेजीतवाड यांचे नेतृत्वात पथकाने तात्काळ कारवाई करत सदर अनोळखी चोरट्याचा शोध घेवुन काही तासातच ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपुस केली असता आरोपी मनोज भाऊसाहेब वाघमारे रा. म्हाडा कॉलनी लातूर.

असे असल्याचे सांगीतले त्याचे कडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले व चोरी केलेली फिर्यादीची रोख रक्कम 90,000/- रु.आरोपी कडुन हस्तगत करण्यात आली. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार अनिल कज्जेवाड हे करीत आहे सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे गांधी चौकचे पथकामधील पोलीस उपनिरीक्षक गणेश गीत्ते, सफौ/राजेंद्र टेकाळे, पोलीस अंमलदार राम गवारे, संतोष गिरी, सचिन चंद्रपाटले, शिवराज भाडुळे, प्रकाश भोसले, राहुल दरोडे, एम.बी.फुटाने यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments