Type Here to Get Search Results !

महसूल कर्मचाऱ्याला मारहाण, सहकाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

 महसूल कर्मचाऱ्याला मारहाण, सहकाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन 



उदगीर (एल पी उगीले) उदगीर येथील पंचायत समितीमध्ये कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत असलेले पंकज अनिल कुमार दंडीमे यांना दिनांक 4 ऑगस्ट रोजी बालाजी भोसले आणि आकाश दयानंद माने यांनी कार्यालयात जाऊन लाभार्थ्यांचे घरकुलांचे पैसे आजच्या जमा कर म्हणून चापटा आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. शासकीय कामात अडथळा आणला. या प्रकरणी पंकज अनिल कुमार दंडीमे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर पोलीस स्टेशन येथे गुरव 278 25 कलम 132, 121 (1), 351 (2) (3), 352, 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुणा नोंद करण्यात आला आहे. 

या घटनेचा निषेध म्हणून उदगीर पंचायत समितीतील पंकज अनिलकुमार दंडीमे यांच्या सहकाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करून या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments