साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धेत शास्त्री विद्यालयाचे यश
उदगीर (प्रतिनिधी)दिनांक 30 व 31 जुलै 2025 रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या सार्वजनिक जयंती महोत्सव समिती,उदगीर तर्फे आयोजित चित्रकला व रांगोळी स्पर्धेत लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयास चित्रकलेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस कु.श्रिया महामुनी हिला रोख रुपये 1500, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र तर रांगोळी स्पर्धेतील सर्व द्वितीय क्रमांकाचे बक्षीस कु.गायत्री कळसाईत हिला रोख रुपये 1000, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तसेच चित्रकला व रांगोळी स्पर्धेतील उत्तेजनार्थ बक्षीस कु.रक्षिता लक्षणे व कु.समिक्षा पटके या दोघांना प्रती 200 रुपये रोख,प्रमाणे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
या यशाबद्दल स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार,कार्यवाह शंकरराव लासुणे, शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे,मुख्याध्यापक संजय कुलकर्णी ,उपमुख्याध्यापक ज्ञानेश मातेकर, पर्यवेक्षक कृष्णा मारावार, किरण नेमट, माधव मठवाले व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शक कलाशिक्षक गुरुदत्त महामुनी यांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment
0 Comments