लातुर जिल्ह्यातल्या मुरुड, करजगाव आणि एकुरगा येथील जिल्हा परिषद शाळेतील आठवीच्या वर्गाला नियमबाह्य मान्यता देण्यात आली. ह्या वर्गाला शासन निर्णय दिनांक 1503/2024 नुसार बंदी घालण्यात आली असून नियमबहाय्य स्वरूपात आणि बेकायदेशीरपणे ह्या वर्गाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडला असून नियमबहाय्य वर्गाची मंजुरी तात्काळ रद्द करा आणि सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा सरसकट सर्वच जिल्हा परिषद शाळांना आठवी वर्गासाठी मंजुरी द्या या मागणी साठी अण्णा हजारे प्रणित लोक आंदोलन न्यास चे लातूर जिल्हा सचिव रामेश्वर बाबुराव सूर्यवंशी व लातूर तालुका अध्यक्ष असलम शेख यांच्या वतीने जिल्हा परिषद येथे आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. आणि उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे पण आज रोजी देश स्वातंत्र झाला सर्व देश देशवासी स्वतंत्र दिन साजरा करत आहेत आणि आजपर्यंत आम्हाला प्रशासनाने दुर्लक्ष करत आहे.पण जोपर्यंत आठवी वर्गाची मान्यता रद्द करून संबंधित सर्व दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन असेच सुरू राहील या मागण्या मान्य नाही झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा देखील यावेळी उपोषण कर्ते रामेश्वर बाबुराव सूर्यवंशी यांनी दिले आहे.


Post a Comment
0 Comments