लातूर/ अंबादास करकरे
लातूर जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बंद घरचा कडीकोंडा तोडून आत मध्ये प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिन्याची चोरी केल्याची घटना घडल्या होत्या. त्यावरून विविध पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे ,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथके तयार करून गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता.
सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना सदरच्या पथकाला बंद घराचे कडीकोंडा तोडून चोरी करणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून दिनांक 11 सप्टेंबर रोजी पथकाने गरुड चौक परिसरातून तीन आरोपींना ताब्यात घेतल. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव सुमित दगडू गर्गेवाड वय 26 वर्ष राहणार सिद्धेश्वर नगर मळवटी रोड लातूर, आकाश उर्फ भावड्या बाबुराव कांबळे वय २५ वर्ष राहणार सिद्धेश्वर नगर मळवटी रोड लातूर, नरसिंग व्यंकट दिवे वय 35 वर्ष राहणार नाथ नगर मळवटी रोड लातूर.
असे असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ त्यांनी चोरी केलेले सोन्याचांदीचे 01 लाख 59 हजार 910 रुपये किमतीचे दागिने मिळून आले. सदरचा मुद्देमाल पोलीस ठाणे अहमदपूर उदगीर ग्रामीण व चाकूर हद्दीमधील बंद घराचे कडी कोंडे तोडून चोरी केल्याचे नमूद आरोपींनी कबूल केले आहे. त्यावरून अहमदपूर उदगीर ग्रामीण व चाकूर येथील प्रत्येकी एक असे एकूण घरफोडी चे तीन गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
नमूद आरोपींना त्यांनी चोरलेल्या मुद्देमालासह पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अमलदार संजय कांबळे, रामलिंग शिंदे, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, सूर्यकांत कलमे, तुराब पठाण, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठ्ठेवाड, गणेश साठे, श्रीनिवास जांभळे यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments