लातूर/अंबादास करकरे
लातूर ग्रामीण मतदार संघातील विविध गावात दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून विकास कामे व्हावी यासाठी लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी वेळोवेळी प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा (दलित वस्ती सुधार) विकास करणे या योजनेअंतर्गत लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील ४५ गावातील ५० कामासाठी ०२ कोटी ७५ लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला आहे त्यात लातूर तालुका ०१ कोटी २१ लक्ष, रेणापूर तालुका ०१ कोटी २८ लक्ष ५० हजार आणि औसा तालुक्यातील भादा सर्कल करिता २६ लाख रुपयेचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून समाज मंदिर बांधकाम, पेव्हर ब्लॉक रस्ता, सिमेंट रस्ता, नाली बांधकाम, विद्युतीकरण करणे यासह विविध कामे केली जाणार आहेत.
लातूर ग्रामीण मतदार संघात दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पुढील प्रमाणे गावनिहाय कामांना मंजुरी मिळाली आहे लातूर तालुका - उमरगा ७ लक्ष, शिवणी खु. ०७ लक्ष, मळवटी ६ लक्ष, सेलू बु. ०६ लक्ष, भातखेडा ३ लक्ष, एकुरगा ०५ लक्ष, वाडीवाघोली ६ लक्ष, सोनवती ०६ लक्ष, गाधवड ६ लक्ष, कारसा ०५ लक्ष, गांजूर /ताडकी दोन कामे ०५ लक्ष, जवळा बु. ६ लक्ष, बोडका ०६ लक्ष, रामेगाव ६ लक्ष, तांदूळजा दोन कामे ६ लक्ष, सलगरा खु. ०५ लक्ष, काटगाव ६ लक्ष, शिराळा ०६ लक्ष, बिंदगीहाळ ५ लक्ष, गातेगाव ०६ लक्ष, आणि चिंचोली ब. ०६ लक्ष याप्रमाणे लातूर तालुक्यात ०१ कोटी २१ लक्ष रुपये मंजूर झाले आहेत.
रेणापूर तालुक्यातील आनंदवाडी ०६ लक्ष, दवणगाव ०७ लक्ष, गरसुळी ६ लक्ष, हरवाडी ०६ लक्ष, कामखेडा ६ लक्ष, खरोळा ०६ लक्ष, कुंभारी ६ लक्ष, कुंभारवाडी ०६ लक्ष, लखमापूर ६ लक्ष, मोरवड ०६ लक्ष, मोटेगाव ६ लक्ष, पानगाव दोन कामे १३ लक्ष, समसापूर ०६ लक्ष, सांगवी दोन कामे १० लक्ष, सुमठाणा ०६ लक्ष, वांगदरी ०६ लक्ष, व्हटी नंबर ०१ दोन कामे ०६ लक्ष, वाला ०५ लक्ष, कारेपूर ०६ लक्ष, दर्जी बोरगाव ३.५० लक्ष याप्रमाणे ०१ कोटी २८ लक्ष ५० हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. तर औसा तालुक्यातील भादा सर्कल मधील भादा ०७ लक्ष, बोरगाव न. ०७ लक्ष, वडजी ०५ लक्ष आणि वानवडा येथे ०७ लक्ष याप्रमाणे एकूण २६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
लातूर ग्रामीण मतदार संघातील ४५ गावात ५० कामासाठी पावणेदोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतल्याबद्दल लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांचे त्या त्या गावातील भाजपा कार्यकर्त्यांसह नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.
Post a Comment
0 Comments