लातूर /अंबादास करकरे
दिनांक 21 सप्टेबर 2025
लातुर तालुक्यातील मौ गंगापूर या गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी तरुण तडफदार नेतृत्व करणारे मा श्री ज्योतीराम जी चिवडे पाटील यांची ग्रामसभेमध्ये सर्वानुमते निवड झाल्यामुळे गावकऱ्यांनी त्यांचा आज दिनांक 21 सप्टेबर रोजी सकाळी ठीक 10:00 दहा वाजता गंगापूर येथील बालाजी मंदिर येथे भव्य असा नागरिक सत्कार करण्यात आला यावेळी गंगापूर गावचे माजी उपसरपंच ईश्वर शेलार बाळू शिंदे बिबीशन शिंदे हनुमंत शिंदे मारुती कस्पटे शहाजीराव शिंदे नेताजी शिंदे ज्ञानोबा हाळे भालचंद्र धोत्रे व्यंकट कदम बंडू कदम श्रीकिशन कदम जमीर मिस्त्री दशरथ फुटाणे रावसाहेब फुटाणे माजिद शेख बाबूलाल शेख जमीर शेख मैनु शेख राजकुमार शिंदे गोरोबा फुटाणे गोपाळ कुकडे लालासासाहे कुकडे गणेश साळुंके संतोष शिंदे दत्ता कुकडे महेताब शेख विकास गायकवाड हमीद शेख राजकुमार सुरवसे राजकुमार बनसोडे शेषराव शिंदे मधुकर सुरवसे विनायक सुरवसे रावसाहेब साळुंके आबासाहेब शेषेराव सुरवसे शिंदे रामभाऊ राऊत रमेश गाडेकर अच्युत गायकवाड युवराज मिंड बळी मिंड ज्ञानेश्वर फुटाणे विकास वाघमारे वैजनाथ जाधव यांच्यासह गंगापूर नगरीतील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कारण तरुण तडफदार नेतृत्व व गोरगरिबांचा कैवारी म्हणून संपूर्ण गंगापूरवासीय ज्यांच्याकडे पाहतात असं एक नेतृत्व मा श्री ज्योतीराम चिवडे पाटील यांची महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती गंगापूरच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे गंगापूर गावामध्ये नवचैतन्याचे वातावरण पसरले आहे त्यामुळेच सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे त्याच पद्धतीने आज सकाळी ठीक दहा वाजता गंगापूर गावातील चौकामध्ये बालाजी मंदिरात सर्व गावकऱ्यांनी मिळून ज्योतीराम चिवडे पाटील यांचा भव्य असा येतोचित सत्कार केला यावेळी चिवड पाटील यांना काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ज्योतीराम चिवडे पाटील म्हणाले की ज्या पद्धतीने मी सर्वसामान्य व्यक्तीचे काम करत असतो त्याच पद्धतीने गावामध्ये कुठल्याही प्रकारे वाद विवाद तंटे होऊ देणार नाही आणि कदाचित अशा काही घटना घडल्याच तर त्या सर्व गावांमध्येच बैठका घेऊन निराकरण करण्याचे काम ही मी स्वतः करणार असल्याचे यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलताना ज्योतीराम चिवडे पाटील यांनी ठामपणे सांगितले माझे गाव माझी जबाबदारी हे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेवूनच मी काम करणार असल्याचेही यावेळी चिवडे पाटील यांनी सांगितले तसेच जनतेने जी माझ्यावर जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जीवाचं रान करणारा असून प्रत्येक क्षेत्रातील लोकांना न्याय देण्याचं काम माझ्या वतीने केले जाईल अशा पद्धतीची हमी सुद्धा यावेळी ज्योतीराम चिवडे पाटील यांनी दिली आहे या सत्कारा बद्दल सर्व गावकऱ्यांचे जोतीराम चिवडे पाटील यांनी आभार मानले.

Post a Comment
0 Comments