Type Here to Get Search Results !

लोखंडी कोयता व छऱ्याची बंदूक घेऊन दहशतआणि भीती निर्माणकरणाऱ्याव्यक्तीला गांधी चौक पोलिसांनी केली अटक.

लातूर/अंबादास करकरे 

लातूर शहरात दिनांक 21/09/2025 रोजी पोलीस स्टेशन गांधी चौक हद्दी मधील बसस्थानक व गंजगोलाई परिसरामध्ये एक तरुण लाल रंगाच्या मोटार सायकल वर बंदूक आणि लोखंडी कोयता घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवत आहे अशी माहिती मिळताच वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड पोलीस स्टेशन गांधी चौक लातूर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन गांधी चौक चे पोलीस अधिकारी व अंमलदार तात्काळ सदर ठिकाणी पोहोचून एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक छऱ्याची बंदूक व एक लोखंडी कोयता मिळाले. सदरील तरुणाचे नाव फारूक इब्राहिम शेख, वय 36 वर्ष, राहणार वीरहनुमंतवाडी, कव्वा नाका, असे आहे सदर तरुणाने त्याच्या जवळील यामाहा R-15 या मोटार सायकलवर बसून हातात छऱ्याची बंदूक व कमरेला असलेला लोखंडी धारदार कोयता बाळगून घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवत असताना मिळून आल्याने पोलीस ठाणे गांधी चौक लातूर येथे गुन्हा नंबर 432/25 कलम 270 बीएनएस 4,5 आर्मएक्ट,135 बीपी एक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) समीरसिंह साळवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे गांधी चौकचे पोलिस निरीक्षक सुनिल रेजितवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश चित्ते, अमर केंद्रे, निखिल पवार, पोलिस अंमलदार रवीसन जाधव, संतोष गिरी, सचिन चंद्रपाटले, शिवा भाडुळे, बेंबडे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments