लातूर/अंबादास करकरे
लोकमत समूहाच्या वतीने नुकताच लंडन येथे “महाराष्ट्ररत्न” पुरस्काराने गौरविण्यात आलेले महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांचा भव्य सत्कार समारंभ डॉ. आंबेडकर मेडिकोज अल्युमिनी असोसिएशन, लातूर यांच्या वतीने दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वा. लातूर येथे पार पडला. या सोहळ्यास लातूर जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर्स, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेषतः डॉ. चंद्रकांत शिरोळे, डॉ. हनुमंत किनीकर, डॉ. अजय ओव्हाळ, डॉ. विजय अजनीकर, डॉ. सुनील होळीकर, डॉ. किरण होळीकर, डॉ. हरिदास, डॉ. सचिन जाधव, डॉ. अभिजित बनसोडे, डॉ. कारेपुरकर यांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. संजय बनसोडे यांनी सत्कारास उत्तर देताना “हा पुरस्कार माझ्या वैयक्तिक यशापेक्षा समाजातील सर्व घटकांचे यश आहे. मी हा सन्मान लोकांना समर्पित करतो. समाजाच्या प्रवाहात दुर्बल घटकांना आणण्यासाठी शिकलेल्या व समृद्ध मंडळींनी सतत पुढाकार घेतला पाहिजे. डॉक्टर समाजातील संवेदनशील घटक असून, त्यांनी वैद्यकीय सेवेसोबत सामाजिक कार्यातही सहभाग घ्यावा. हा सन्मान माझ्या घरचाच सन्मान असून, तो माझ्या जबाबदारीत भर घालणारा आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. चंद्रकांत शिरोळे तर प्रास्ताविक डॉ. विजय अजनीकर यांनी केले.
डॉ. अजय ओव्हाळ, डॉ. सुनील होळीकर, डॉ. महेंद्र सोनवणे, डॉ. हरिदास, डॉ. किनीकर, डॉ. देवनीकर, डॉ. अभिजित बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी आभार डॉ. सचिन जाधव यांनी मानले.
यावेळी डॉ. सदानंद कांबळे, डॉ. सी. टी. कांबळे, डॉ. भारती, डॉ. चावडा, डॉ. महेंद्र सोनवणे, डॉ. संकेत, डॉ. जगदीश, डॉ. हंसराज कांबळे, डॉ. अतुल लातूरकर, डॉ. आशिष सरवदे, डॉ. रवींद्र भालेराव, डॉ. रवींद्र सोनकांबळे, डॉ. सोमवंशी आदी लातूर जिल्ह्यातील डॉक्टर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments