Type Here to Get Search Results !

करकट्टा सोसायटी भाजपाच्या ताब्यात; आ. कराड यांच्या हस्ते नुतन सदस्यांचा सत्कार



लातूर/अंबादास करकरे 

लातूर दि. २२ - लातूर तालुक्यातील मौजे करकट्टा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपाच्या शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व 11 पैकी 11 जागा जिंकून सोसायटीवर वर्चस्व सिद्ध केले आहे. लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांनी या निवडणुकीतील नवनिर्वाचित सोसायटी सदस्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.

                   भाजपाच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकत करकट्टा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत बाजी मारली. या निवडणुकीत विजय प्राप्त केलेल्या रमेश शिंदेबालासाहेब इंगळेभाऊसाहेब शिंदेहरिभाऊ मानेमिनाबाई शिंदेजनाबाई इंगळेरामलिंग गायकवाड या सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी सोमवारी लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात सत्कार करून अभिनंदन केले.

                   येत्या काळात शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करावी अशा सूचना आ. रमेशआप्पा कराड यांनी नवनिर्वाचित सदस्यांना केल्या. याप्रसंगी संजय गांधी निराधार योजना समितीचे लातूर तालुका अध्यक्ष बन्सी भिसेमाजी अध्यक्ष वैभव सापसोडबालाजी पठाडेजनक इंगळेईश्वर शिंदेबाळासाहेब शिंदेसुरेश शिंदेबंडू माचवे यांच्यासह अनेक जण होते.

Post a Comment

0 Comments