Type Here to Get Search Results !

प्रादेशिक परिवहन विभागाने MH24-CC मालिकेअंतर्गत आकर्षक वाहन क्रमांक राखीव करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन !



लातूर/अंबादास करकरे 

लातूर, दि. ३१ ऑगस्ट २०२५: परिवहनेत्तर (मोटरसायकल) संवर्गातील वाहनांसाठी MH24-CC ही नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. या मालिकेअंतर्गत आकर्षक आणि पसंतीचे वाहन क्रमांक राखीव करण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात राबविली जाणार आहे.

दिनांक ०२ सप्टेंबर २०२५ रोजी मोटार कार आणि मालवाहू वाहनांसाठी (दुचाकी वगळून), तर दिनांक ०३ सप्टेंबर २०२५ रोजी दुचाकी वाहनांसाठी सकाळी १०:३० ते दुपारी २:३० या वेळेत अर्ज आणि विहित शुल्कासह राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश (डीडी) स्वीकारला जाईल.एखाद्या विशिष्ट क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास, त्या क्रमांकाचा लिलाव दिनांक ०३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४:०० वाजता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात आयोजित केला जाईल. 

लिलावात सहभागी अर्जदाराने वाढीव रक्कमेचा धनादेश (डीडी) सादर करणे बंधनकारक असेल. ज्या अर्जदाराने सर्वाधिक वाढीव रक्कमेचा धनादेश सादर केला, त्याला संबंधित आकर्षक पसंतीचा क्रमांक राखीव ठेवला जाईल. सर्व इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments