लातूर/अंबादास करकरे
लातूर मांजरा नदीवर लातूर तालुक्यातील मौजे कानडी बोरगाव अंजनपूर निम्म पातळी बंधाऱ्याचे मुळी बंधाऱ्याच्या धरतीवर नवीन उभ्या उचल पद्धतीचे स्वयंचलित दरवाजे बसविण्यासाठी ज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने तब्बल १३ कोटी ९० लाख रुपयाचा निधी मंजूर केला असल्याची माहिती लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी दिली.
गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत लातूर तालुक्यातील मौजे कानडी बोरगाव गावाजवळ मांजरा नदीवर निम्मपातळीचा गेल्या २००८ साली बंधारा बांधण्यात आला. मागील काळात पूरपरिस्थितीत या बोरगाव अंजनपूर बंधाऱ्याचे सर्व सातही स्वयंचलित गोडबोले गेटचे भाग तुटून क्षतीग्रस्त झाल्याने बंधाऱ्यात पाणीसाठा होत नव्हता. बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि जलसंपदा मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी तोंडी मागणी करून वेळोवेळी पाठपुरावा केला.
आ. रमेशआप्पा कराड यांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्याच्या जलसंपदा विभागाने ४ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार कानडी बोरगाव अंजनपूर या बंधाऱ्यास मुळी बंधाऱ्याच्या धरतीवर नवीन उभ्या उचल पद्धतीचे दहा बाय चार मीटर या आकाराचे एकूण सात दरवाजे बसविण्याच्या कामाला त्याचबरोबर साहित्याकरिता दक्षता कक्ष बांधकामासाठी व बंधाऱ्याच्या साहित्यासाठी तब्बल १३ कोटी ९० लक्ष १५ हजार रुपये एवढा निधी मंजूर केला आहे.
कानडी बोरगाव अंजनपूर निम्न पातळी बंधारा अनेक दिवसांपासून दुरावस्थेत असल्याने असून अडचण नसून खोळंबा याप्रमाणे त्या परिसरातील शेतकऱ्यांना कसलाच बंधाऱ्याचा फायदा होत नव्हता. शेतक-यांची होणारी गैरसोय लक्षात घेवून आ. रमेशअप्पा कराड यांनी या बंधा-याच्या कामाला प्राधान्य देत पाठपुरावा केला होता. निधी मंजूर झाल्याने लवकरच बंधाऱ्याचे काम होणार असून नवीन पद्धतीचे दरवाजे बसविण्यात आल्यानंतर बंधाऱ्यात शंभर टक्के पाणीसाठा होणे शक्य आहे. पुराचे साठलेले पाणी नदीपात्रात सोडणे, नदीकाठच्या भूभागात पाणी मुरून भूजल साठ्यात वाढ होईल. एकूणच बंधारा परिसरातील शेतकऱ्यांना निश्चितपणे मोठा फायदा होणार आहे. सदर कामासाठी १४ कोटीचा निधी मंजूर केल्याबद्दल लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी राज्याचमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.
Post a Comment
0 Comments