वलांडी /देवणी
अंबादास करकरे
तालुक्यातील वलांडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडीत अध्यक्षपदी अविनाश गायकवाड तर उपाध्यक्षपदी नयुम बागवान यांची बहुमताने निवड झाली. या निवडीसाठी एकूण १५ सदस्य मतदान प्रक्रियेत सहभागी झाले. ज्यामध्ये ११ पालक सदस्य, १ शिक्षक प्रेमी, १ ग्रामपंचायत सदस्य, १ शिक्षक आणि १ मुख्याध्यापक यांचा समावेश होता. अध्यक्षपदासाठी चार पालक उमेदवारांनी लोकशाही
पद्धतीने नामनिर्देशन दाखल केले होते. मतदान प्रक्रियेत अध्यक्षपदासाठी ९ तर उपाध्यक्ष पदासाठी १० मतं मिळाल्याने या दोघांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली.या निवड प्रक्रियेस जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका नजमा बेगम कुरेशी, मुख्याध्यापक तानाजी पाटील, हरिश्चंद्र कांबळे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक कादरी, ग्रामरोजगार सेवक विठ्ठल बनसोडे तसेच पालक उपस्थित होता. नव्याने निवडून आलेल्या अध्यक्ष अविनाश गायकवाड व उपाध्यक्ष नयुम बागवान यांचा उपस्थितांनी सत्कार केला

Post a Comment
0 Comments