Type Here to Get Search Results !

रेणापूर येथील शेख रिजवान देशात तिसरा आ रमेशआप्पा कराड यांच्याकडून अभिनंदन




अंबादास करकरे

लातूर दि. १५- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रिशियन या विषयात ९९.१६ टक्के गुण मिळवून रेणापूर येथील शेख रिजवान शहेनशाह या विद्यार्थ्याने देशात तिसऱ्या क्रमांकाचे घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी यथोचित सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

       रेणापूर येथील शेख शहेनशाह सुलेमान यांचा मुलगा शेख रिजवान याने चाकूर नजीक ग्रामीण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत इलेक्ट्रिशियन करिता प्रवेश घेतला होता. जिद्द आणि मेहनत करून शेख रिजवान याने ९९.१६ टक्के गुण मिळवून देशात तिसऱ्या क्रमांकाचे घवघवीत यश संपादन केले. या यशाबद्दल भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी मंगळवारी भाजपाच्या संवाद कार्यालयात यथोचित सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ भोसलेरेणापूरचे प्रथम नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरेभाजपा शहराध्यक्ष अच्युत कातळेशेख रिजवान यांचे वडील शेख शहेनशाहचुलते शेख खलीलमारूफ अत्तारशेख सलीमशेख मकसूदरफिक शिकलकर यांच्यासह इतर अनेक जण होते.

Post a Comment

0 Comments