उदगीर/अंबादास करकरे
उदगीर जि.लातूर येथे राज्याचे सहकार मंत्री मा. ना. बाबासाहेब पाटील, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या संकल्पनेतुन साकारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्या दरम्यान विश्वशांती बुद्धविहार परिसरात शिल्पाकृती व गार्डन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर किडो वंडरलँड आणि पार्क या विकासकामांचे भूमिपूजनही पार पडले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान देशाला दिशा दाखवणारे आहे. विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे हे स्मारक म्हणजे देशाचा स्वाभिमान आहे.
महामानव , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे स्मारक संघर्षाचे प्रतीक, स्वाभिमानाचा आवाज आणि त्यांच्या विचारांचे जिवंत प्रतीक ठरणार असून समाजाला अधिक प्रगत, जागरूक आणि समतेच्या मार्गावर चालणारे प्रेरणास्थळ बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी राज्यमंत्री मा. इंद्रनील नाईक, माजी खा.प्रा.जोगेंद्रजी कवाडे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार श्री. गोविंदराव अण्णा केंद्रे, भदंत उपगुप्त महाथेरो, भंते पय्यानंद थेरो, भंते नागसेन बोधी, यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Post a Comment
0 Comments