Type Here to Get Search Results !

लातूरमध्ये पोक्सो गुन्हा — अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दोन कॅफे चालकांसह तीन जण अटकेत.

अंबादास करकरे 

लातूर : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी लातूर शहर पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोन कॅफे चालकांना अटक केली आहे. या दोन्ही कॅफे चालकांनी अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांच्यावरही पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

शिवाजी नगर, लातूर येथे गु.र. क्रमांक ४६८/२०२५, कलम १३७(२) बीएनएस प्रमाणे ४ डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दाखल झाली. फिर्यादीनंतर मसपोनि सुप्रिया केंद्रे यांनी तातडीने पिडीत मुलीचा शोध घेतला. चौकशीत मुलीने माहिती दिल्याप्रमाणे, रिहान गुलाब शेख (वय १८ वर्षे, रा. सेलु, ता. औसा) याने तिला जबरदस्तीने पळवून नेऊन दोन वेगवेगळ्या कॅफे ठिकाणी नेले.

डेली ग्रीन्ड, खर्डेकर स्टॉप, औसा रोड, लातूर, एस.पी. कॅफे डेअर, खाडगाव टी पॉइंट, रिंग रोड, लातूर येथे आरोपीने जबरी संभोग केल्याचा आरोप मुलीने नोंदवला. बाब उघड झाल्यानंतर गुन्ह्यात बीएनएस कलम ६४, ६५, ६९, ३५१(२) सह पोक्सो कलम ४, ६, ८, १२ तसेच अ.जा.ज.अ.प्र.का. १९८९ अन्वये कलम 3(1)(W), 3(2)(Va) अशी कलमवाढ करण्यात आली.

प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्याकडे वर्ग करण्यात आला. तपासादरम्यान मुख्य आरोपी रिहान शेख यास ४ डिसेंबर रोजी अटक करून ५ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यानंतर तपासादरम्यान अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणे आणि गुन्ह्यास प्रोत्साहन देणे हे करणारे दोन कॅफे चालक निष्पन्न झाले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे—


1. सुरज राजेश ढगे (वय 29 वर्षे) व्यवसाय : एस. पी. कॅफे रा. द्वारकापुरी अपार्टमेंट, खाडगाव रोड, लातूर, 2. अनिकेत अजय कोटुळे (वय 27 वर्षे) व्यवसाय : कॅफे डेली ग्रींड रा. साई रोड, लातूर या दोघांना पोक्सो कलम १७ अंतर्गत अटक करून ५ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना ८ डिसेंबरपर्यंत पीसीआर मंजूर केला.

गुन्ह्याच्या तपासादरम्यान मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या सहाय्याने तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, सहा. पोलीस निरीक्षक सुप्रिया केंद्रे, तसेच पोलीस कर्मचारी महेश पारडे, गणेश मोरे, मिलींद कांबळे, पांडुरंग सगरे, राहुल क्षिरसागर यांनी योगदान दिले.

फॉरेन्सिक टीममधील अर्जुन मुळे व श्रुती पंचगल्ले यांनी तांत्रिक तपासात मदत केली. लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात आले आहे की अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे, त्यांच्यावर अत्याचार करणे किंवा अशा गुन्ह्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, मदत करणे किंवा माहिती लपवणे हा गंभीर गुन्हा असून, संबंधित लॉज, कॅफे, हॉटेल चालक/मालकांवर देखील पोक्सो कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments