Type Here to Get Search Results !

इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांची भाजप अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

 

अंबादास करकरे 

लातूर, उच्च शिक्षित, अभ्यासू आणि तळागाळाशी नाळ जुळलेले व्यक्तिमत्त्व असलेले इंजिनियर विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांची भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, समाजातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

इंजि. गायकवाड हे शैक्षणिकदृष्ट्या सक्षम आणि संघटनात्मक कामाचा भक्कम अनुभव असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेत, विशेषतः वंचित, शोषित आणि मागास घटकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांशी सतत संपर्क ठेवून त्यांनी संघटन मजबूत करण्यावर भर दिला.

त्यांची ही नियुक्ती केवळ एका व्यक्तीची पदनियुक्ती नसून, अनुसूचित जाती समाजाच्या सशक्तीकरणासाठी पक्षाने दाखवलेला दृढ विश्वास असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सामाजिक समरसता, सर्वसमावेशक विकास आणि न्याय्य हक्कांसाठी लढा या भूमिकेतून ते काम करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

इंजि. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती मोर्चा अधिक सक्षम, प्रभावी आणि जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारा बनेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. युवकांना राजकारणात सक्रिय सहभागासाठी प्रेरित करणे, शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणणे यावर ते विशेष भर देतील, असे सांगितले जाते.

या महत्त्वपूर्ण जबाबदारीबद्दल इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांचे सर्व स्तरांतून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे मोर्चाला नवी दिशा व नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे

Post a Comment

0 Comments