Type Here to Get Search Results !

लातूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी सचिन बंडापल्ले तर फैजलखान कायमखानी यांची परिवहन समिती पदी निवड!





अंबादास करकरे 

लातूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी आज अधिकृत निवड प्रक्रिया पार पडली. ही निवड सहकारमहर्षींच्या मार्गदर्शनाखाली तसेच दिलीपराव देशमुख, अमित विलासराव देशमुख आणि शिवाजीराव काळगे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.

या निवड प्रक्रियेस जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच महानगरपालिका आयुक्त मानसी मीना यांच्या उपस्थितीत ही निवड अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली. निवडीनंतर नव्या सभापतीचा सत्कारही करण्यात आला.

या कार्यक्रमास महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर स्नेहल उटगे, माजी महापौर दिपक सूळ, गटनेते विजयकुमार साबदे, शहराध्यक्ष नगरसेवक किरण जाधव, वंचित बहुजन आघाडीचे गटनेते अमोल लांडगे, तसेच सचिन गायकवाड, फारुख शेख, शेहनाज गोलंदाज, अंकिता भडीकर यांच्यासह स्थायी समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

या निवडीमुळे महानगरपालिकेच्या कामकाजाला अधिक गती मिळणार असून शहरातील विकासकामांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडलेली ही निवड प्रक्रिया शांततेत आणि उत्साहात पार पडली.

Post a Comment

0 Comments