Type Here to Get Search Results !

*रुद्धा (ता.अहमदपूर) येथील बाप-लेकाच्या दुहेरी खुनाचा अवघ्या आठ तासांत आरोपीला अटक.*

 
लातूर/करकरे अंबादास

अहमदपूर तालुक्यातील रुद्धा शिवारात घडलेल्या बाप–लेकाच्या निघृण खुनाचा अवघ्या आठ तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक करण्याची उल्लेखनीय कामगिरी लातूर पोलीस दलाने केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि अहमदपूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ३ ते ४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री रुद्धा शिवारातील त्यांच्या शेतीत असलेल्या आखाड्यावर शिवराज निवृत्ती सुरनर (वय ७० वर्षे) आणि त्यांचा मुलगा विश्वनाथ शिवराज सुरनर (वय २० वर्षे) या दोघांची अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी विशेष पथक नेमले. गुन्ह्याचा तपास अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रायबोले यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आला. पथकाने घटनास्थळावरील पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि मृत व्यक्तींचे वैयक्तिक व जमीनसंबंधी वाद यांचा बारकाईने तपास केला.

तपासादरम्यान जमिनीच्या वादातून ही दुर्दैवी घटना घडल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मिळालेल्या सुगाव्यावरून संशयितांवर लक्ष ठेवत, अचूक माहितीच्या आधारे केवळ आठ तासांत नरसिंग भाऊराव शिंदे (वय ६०) आणि केरबा नरसिंग शिंदे (वय २३) (दोघे रा. करेवाडी, ता. लोहा, जि. नांदेड) या आरोपींना अटक केली.

आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळविण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या देखरेखीखाली, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी  रायबोले यांच्या नेतृत्वात करण्यात आली. संयुक्त पथकात पोलीस निरीक्षक विनोद म्हेत्रेवार, पो.नि. सुधाकर बावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, संतोष केदासे, पो.उ.नि. राजेश घाडगे, प्रमोद देशमुख, तसेच पोलीस अंमलदार संजय कांबळे, रामलिंग शिंदे, साहेबराव हाके, अर्जुन राजपुत, दिनानाथ देवकते, युवराज गिरी, माधव बिलापटटे, नवनाथ हासबे, राजेश कचे, तुराब पठाण, मुन्ना मदने, जमीर शेख, पाराजी पुठठेवाड, तुळशीराम बरुरे, राहुल काबळे, शैलेश सुडे, गणेश साठे, व्यंकटेश निदुरे, श्रीनिवास जांभळे, तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील तानाजी आरदवाड, विशाल सारुळे, कांबळवाड आणि महिला पोलीस अंमलदार अंजली गायकवाड यांचा समावेश होता.

या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अमोल तांबे म्हणाले, “अत्यंत गंभीर स्वरूपाच्या या दुहेरी खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी दाखविलेली वेगवान व परिणामकारक कार्यवाही उल्लेखनीय आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा पोलीस दल सदैव तत्पर असून अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलली जातील.”



Post a Comment

0 Comments