Type Here to Get Search Results !

सहा महिन्यांपासून फरार असलेले सराईत गुन्हेगार व संघटित गुन्हेगारी टोळीचे प्रमुख शक्ती उर्फ योगेश अशोक गुरणे आणि त्याचा उजवा हात आकाश उर्फ अक्षय सगर यांना अटक.


लातूर/अंबादास करकरे 

दि. 04/06/2025 रोजी सायंकाळी सुमारे 16.00 वाजताच्या सुमारास देवगिरी बार, औसा रोड, चांडेश्वर येथे आरोपी शक्ती उर्फ योगेश अशोक गुरणे, इस्माईल उर्फ बाबा जलील शेख, किशोर बालाजी मस्के, आकाश उर्फ अक्षय सुरेश सगर उर्फ सगट व इतर सुमारे 10 जण यांनी फिर्यादी अविनाश महादेव बोयणे यास “आम्हाला दरमहा 2000 रुपये हप्ता व आमच्या मुलांना मोफत सुपारी का देत नाहीस” या कारणावरून एकत्र येऊन लोखंडी कत्ती व बारमधील खुर्च्याने मारहाण केली. या प्रकरणी पोलीस ठाणे लातूर ग्रामीण येथे गु. र. नं. 133/2025 हा गुन्हा कलम 109, 308(1), 189(2), 191(2), 191(3), 190 भारतीय न्याय संहिता-2023 अंतर्गत दि. 05/06/2025 रोजी सायं. 19.09 वाजता दाखल करण्यात आला होता.

फरार आरोपींच्या अटकेसंदर्भात कारवाही या प्रकरणातील एकूण सहा आरोपी गेल्या सहा महिन्यांपासून फरार होते. त्यापैकी मुख्य आरोपी टोळीप्रमुख शक्ती उर्फ योगेश अशोक गुरणे व त्याचा साथीदार आकाश उर्फ अक्षय सुरेश सगर उर्फ सगट यांना अटक करण्यात आली असून, आज दिनांक 08/11/2025 रोजी त्यांना मा. न्यायालयासमोर हजर केले असता दोन्ही आरोपींना पाच दिवसांचा पोलीस कोठडी (PCR) मंजूर करण्यात आला आहे.


दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्या विरोधात खंडणी, दहशत निर्माण करणे आणि इतर गुन्ह्यांच्या संदर्भात सखोल तपास सुरू आहे. आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली लोखंडी कत्ती जप्त करण्यात आली आहे. आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास करता आढळले की, लातूर शहरात त्यांनी दहशत निर्माण करून आर्थिक फायद्यासाठी दरोडे, जबरी चोरी, बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्याराने मारहाण, खंडणी, इत्यादी स्वरूपाचे एकूण 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत. या कारणास्तव मा. विशेष पोलीस उपमहानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र यांच्या परवानगीने त्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) 1999 अंतर्गत कलमवाढ करण्यात आली आहे.


त्यानुसार आरोपी क्र. 1 ते 4 यांच्याविरुद्ध कलम 3(1)(ii), 3(2), 3(4) अंतर्गत ८६० पानी दोषारोपपत्र तयार करून मा. विशेष मोक्का न्यायालय, लातूर येथे सादर करण्यात आले असून, त्यास मा. अपर पोलीस महासंचालक (कावसु), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची मंजुरी प्राप्त झालेली आहे. कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी सदर कारवाई अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लातूर, व मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली, साहेबराव नरवाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर ग्रामीण, व अरविंद पवार, पोलीस निरीक्षक, पो. स्टे. लातूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपासकामात खालील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत:

सपोनि. बाळासाहेब डोंगरे, सपोनि. सदानंद भुजबळ (स्थानिक गुन्हे शाखा), पोलिस अंमलदार माधव बिल्लापट्टे, प्रदीप स्वामी, धारेकर, तुराब पठाण, वाजीद चिकले, कुंडलिक खंडागळे, प्रल्हाद केंद्रे, संतोष थोरात इत्यादी.

Post a Comment

0 Comments