लातूर, ९ नोव्हेंबर:
अंबादास करकरे
दीर्घ प्रतीक्षेनंतर किल्लारी येथील निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना (पूर्वीचा किल्लारी कारखाना) पुन्हा नव्या जोमाने सुरू होत आहे. या कारखान्याच्या गळीत हंगाम २०२५-२६ चा शुभारंभ उद्या, म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. ना. नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते होणार आहे.
हा कार्यक्रम लातूर व धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी क्षण ठरणार आहे. जुना किल्लारी साखर कारखाना आता नव्या नावाने निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू होत आहे.
कारखान्याची क्षमता दुप्पट उत्पादन क्षमतेत मोठी वाढ करण्यात आली असून, कारखान्याची १२५० TCD वरून २५०० TCD इतकी वाढ झाली आहे. ८०% नवीन मशिनरी अत्याधुनिक यंत्रसामग्रीची बसवण्यात आली आहे, ज्यामुळे उत्पादन प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि अखंड राहणार आहे.
१५ वर्षांनंतर पुनरुज्जीवन गेल्या १५ वर्षांपासून बंद असलेला हा कारखाना (एक-दोन वर्षांच्या अपवाद वगळता) पुन्हा सुरू होत आहे. या पुनरुज्जीवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याचा मोठा वाटा आहे.
कार्यक्रमाचे मान्यवर उद्घाटक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (शेतकऱ्यांचा “अन्नदाता ते ऊर्जादाता” असा गौरव करणारे दूरदृष्टी नेते) प्रमुख अतिथी राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले, अध्यक्षस्थान सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ व उद्योजक बी. बी. ठोबरे, हे उपस्थित राहणार आहेत.
या ऐतिहासिक कार्यक्रमास लातूर व धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकरी, ऊस उत्पादक, ग्रामस्थ व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण: निळकंठेश्वर साखर कारखान्याचे प्रांगण, किल्लारी वेळ: सकाळी ११:३० वाजता या शुभारंभानिमित्त नितीन गडकरी यांच्या भाषणातून शेतकऱ्यांसाठी नव्या संधी आणि ऊस उत्पादक उद्योगातील परिवर्तनाविषयी मार्गदर्शन अपेक्षित आहे.

Post a Comment
0 Comments