लातूर/अंबादास करकरे
माझं लातूर परिवारातील सक्रिय सदस्य तथा धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते उमेश अंबादास कांबळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत इंदोरच्या माँ भुवनेश्वरी ज्योतिष वास्तू कर्मकांड शोध संस्थानने उमेश यांची मानद डॉक्टरेट पदवीसाठी निवड केली.
माझं लातूर परिवाराच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात आघाडीवर. रक्तदान, गरजू रुग्णांना मदत, लातूर जिल्हा रूग्णालय आंदोलनाचे लढवय्ये योद्धे म्हणून ओळख.
काल इंदोर येथे संस्थानच्या महामेळाव्यात उमेश यांना सन्मानित करण्यात आले.
माझं लातूर परिवाराच्या वतीने सतीशमामा तांदळे यांनी उमेश यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments