लातूर/ अंबादास करकरे
लातूर : राज्य रक्त संक्रमण परिषद (SBTC) मुंबई यांच्या वतीने राज्यातील सर्व सामाजिक संस्था आणि संघटना यांना रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र राज्यात आणि विशेषतः लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा वाढला असल्याने सकल मराठा परिवार आणि सकल मराठा विद्यार्थी परिषद यांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत लातूरच्या सकल मराठा परिवार शाखेच्या वतीने येत्या १६ नोव्हेंबर २०२५ वार रविवार या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर येथे सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये रक्तदात्यांना योग्य सुविधा आणि सम्मान दिला जाईल. रक्तदान केल्याने कोणताही दुष्परिणाम होत नाही आणि ३ महिन्यांनी पुन्हा रक्तदान करता येते. सकल मराठा परिवार आणि सकल मराठा विद्यार्थी परिषद यांच्या वतीने या भव्य रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी असे आवाहन करण्यात आले आहे. रक्तदान करू इच्छिणाऱ्या रक्तदात्यांनी राहुल जाधव - ७५०७६२६७६२ यांच्याकडे नाव नोंदणी करावी अशी विनंती सकल मराठा परिवाराने केली आहे.

Post a Comment
0 Comments