लातूर :- सकल मराठा परिवार लातूर यांच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घेण्यात आलेल्या शिबिरात ५३ रक्तदत्यांनी या महत्वपूर्ण सामाजिक उपक्रमात रक्तदान करीत आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली.
राज्य रक्त संक्रमण परिषद (SBTC) महाराष्ट्र राज्य यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आयोजित केलेल्या या शिबिरात रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन प्रथम रक्तदाते आणि सकल मराठा परिवार लातूरचे सदस्य राहुल दत्तात्रय जाधव, गंगाधर पवार, किशोर धायगुडे, बळवंत जाधव, संतोष पवार यांनी केले. शिबिरात रक्तदात्यांना अल्पोपहार आणि मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. रक्तदान शिबिरासाठी श्रीमती सरस्वती कराड रक्तपेढीचे विकास कारंजे यांचे विशेष सहकार्य लाभले.
या शिबिरातून मिळालेल्या रक्ताचा उपयोग थॅलेसेमिया, दुर्घटना पीडित, शस्त्रक्रिया, गर्भवती माता आणि कॅन्सर पीडितांना जीवनदान देण्यासाठी केला जाईल अशी माहिती सकल मराठा परिवाराने दिली. तसेच समाजातील सर्व क्षेत्रातील नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन केले. श्रीमती सरस्वती रक्तपेढीचे डॉक्टर डी बी दाताळ, डॉक्टर शुभम शिवणे टेक्निकल सुपरवायझर विकास कारंजे, अर्जुन वाघचौरे, शिवाजी जवादे, सामाजिक कार्यकर्त्या सुचिता भागवते, अच्युत पाटील बालाजी कराड आदींनी या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments