Type Here to Get Search Results !

रेणापूर नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून शोभा आकनगिरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल लातूर, दि. १५: रेणापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्रीमती शोभा शामराव आकनगिरे यांनी आज (१५ नोव्हेंबर, शनिवार) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रेणापूर तहसील कार्यालयात हा अर्ज भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करण्यासाठी भाजपाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी रेणापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत नगराध्यक्षपद महिला राखीव आहे. शहरात गेल्या काही वर्षांत झालेली कोट्यवधी रुपयांची विकासकामे आणि आ. रमेशआप्पा कराड यांचे नेतृत्व लक्षात घेता भारतीय जनता पक्ष ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवत आहे. अर्ज दाखल करताना उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत सोट, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ भोसले, जिल्हा चिटणीस दशरथ सरवदे, माजी सभापती अनिल भिसे, उपसभापती अनंत चव्हाण, मंडल अध्यक्ष महेंद्र गोडभरले, रेणापूरचे पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, शहराध्यक्ष अच्युत कातळे, किसान मोर्चाचे साहेबराव मुळे, महादेव साळुंखे, अँड. मनोज कराड, सरपंच सुनील चेवले, रवींद्र नागरगोजे, नामदेव बोंबडे, विष्णू गोरे, पद्माकर चिंचोलकर, रवींद्र पाटील, रामराव मोरे, विजय चव्हाण, श्रीकृष्ण मोटेगावकर, दत्ता सरवदे, चंद्रकांत कातळे, श्रीकृष्ण जाधव, संजय वीरुळे, दिलीप आकनगिरे, नारायण राठोड, महेश गाडे, मारूफ आतार, गणेश चव्हाण, राजकुमार आलापुरे, श्रीकृष्ण पवार, शेख शफी, दिलीप चव्हाण, गणेश माळेगावकर, शिवाजी जाधव, मच्छिंद्र चक्रे, अंकुश मोटेगावकर, लक्ष्मण खलंगरे, अंतराम चव्हाण, धम्मानंद घोडके, उत्तम चव्हाण, श्रीमंत नागरगोजे, ज्ञानेश्वर शिंदे, हनुमंत भालेराव, लखन आवळे, डॉ. मोहाळे, रफिक शिकलकर, सोपान सातपुते, राजकुमार आकनगिरे, नरसिंग येलगटे, इस्माईल बावचकर, संतोष राठोड, योगेश राठोड, शरद चक्रे, रमा चव्हाण, मनोज चक्रे, फारूक कुरेशी, शेख अजीम, जगन्नाथ कातळे, अंकित हाके, सलीम शेख, अवेज कुरेशी, लक्ष्मण दळवी, सोमनाथ व्यवस्थारे, रोहन पांचाळ, आर्षद तांबोळी, सोनू उरगुंडे, हुसेन पठाण, महेश वरवटे यांसह भाजपाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान परिसरात उत्साहाचे आणि ऐक्याचे वातावरण पाहायला मिळाले. रेणापूर शहरात आगामी निवडणुकीबाबत राजकीय वातावरण तापू लागले असून भाजपाच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमामुळे निवडणुकीची रंगत अधिक वाढली आहे.


लातूर/ अंबादास करकरे 

लातूर, दि. १५: रेणापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्रीमती शोभा शामराव आकनगिरे यांनी आज (१५ नोव्हेंबर, शनिवार) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रेणापूर तहसील कार्यालयात हा अर्ज भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करण्यासाठी भाजपाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी रेणापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत नगराध्यक्षपद महिला राखीव आहे. शहरात गेल्या काही वर्षांत झालेली कोट्यवधी रुपयांची विकासकामे आणि आ. रमेशआप्पा कराड यांचे नेतृत्व लक्षात घेता भारतीय जनता पक्ष ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवत आहे.


अर्ज दाखल करताना उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत सोट, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ भोसले, जिल्हा चिटणीस दशरथ सरवदे, माजी सभापती अनिल भिसे, उपसभापती अनंत चव्हाण, मंडल अध्यक्ष महेंद्र गोडभरले, रेणापूरचे पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, शहराध्यक्ष अच्युत कातळे, किसान मोर्चाचे साहेबराव मुळे, महादेव साळुंखे, अँड. मनोज कराड, सरपंच सुनील चेवले, रवींद्र नागरगोजे, नामदेव बोंबडे, विष्णू गोरे, पद्माकर चिंचोलकर, रवींद्र पाटील, रामराव मोरे, विजय चव्हाण, श्रीकृष्ण मोटेगावकर, दत्ता सरवदे, चंद्रकांत कातळे, श्रीकृष्ण जाधव, संजय वीरुळे, दिलीप आकनगिरे, नारायण राठोड, महेश गाडे, मारूफ आतार, गणेश चव्हाण, राजकुमार आलापुरे, श्रीकृष्ण पवार, शेख शफी, दिलीप चव्हाण, गणेश माळेगावकर, शिवाजी जाधव, मच्छिंद्र चक्रे, अंकुश मोटेगावकर, लक्ष्मण खलंगरे, अंतराम चव्हाण, धम्मानंद घोडके, उत्तम चव्हाण, श्रीमंत नागरगोजे, ज्ञानेश्वर शिंदे, हनुमंत भालेराव, लखन आवळे, डॉ. मोहाळे, रफिक शिकलकर, सोपान सातपुते, राजकुमार आकनगिरे, नरसिंग येलगटे, इस्माईल बावचकर, संतोष राठोड, योगेश राठोड, शरद चक्रे, रमा चव्हाण, मनोज चक्रे, फारूक कुरेशी, शेख अजीम, जगन्नाथ कातळे, अंकित हाके, सलीम शेख, अवेज कुरेशी, लक्ष्मण दळवी, सोमनाथ व्यवस्थारे, रोहन पांचाळ, आर्षद तांबोळी, सोनू उरगुंडे, हुसेन पठाण, महेश वरवटे यांसह भाजपाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान परिसरात उत्साहाचे आणि ऐक्याचे वातावरण पाहायला मिळाले. रेणापूर शहरात आगामी निवडणुकीबाबत राजकीय वातावरण तापू लागले असून भाजपाच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमामुळे निवडणुकीची रंगत अधिक वाढली आहे.


Post a Comment

0 Comments