अंबादास करकरे
उदगीर–जळकोट मतदारसंघातील जनतेने सलग दुसऱ्यांदा दाखविलेल्या विश्वासाला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात आनंदोत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात प्रामाणिक, पारदर्शक आणि विकासाभिमुख कामगिरीच्या बळावर सलग दुसऱ्यांदा निवडून दिलेल्या आमदारांचा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
आमदारांनी मतदारसंघातील जनतेकडून मिळालेला विश्वास हा केवळ सन्मान नसून पुढील काळात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा असल्याचे सांगितले. “आपल्या प्रेमाने आणि पाठिंब्याने मला सलग दुसऱ्यांदा विधानसभा पावसात पाठवले. हा विश्वास माझ्यासाठी मोठी ताकद असून विकासाचे काम अधिक वेगाने पुढे नेण्याचा दृढ निश्चय मी केला आहे,” असे आमदारांनी यावेळी सांगितले.
कार्यकर्त्यांकडून उत्साहाने आयोजित सत्कार सोहळा
विश्वासाच्या वर्षपूर्तीनिमित्त उदगीर आणि जळकोट तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक मोठ्या उत्साहाने एकत्र आले. केक कापून आमदारांचा सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, समाधान आणि पक्षावरील विश्वास पाहून हा क्षण आमदारांसाठी “अविस्मरणीय” ठरल्याचे त्यांनी व्यक्त केले.
सन्मानामुळे काम करण्याची नवी उर्जा मिळाल्याचे सांगत आमदार म्हणाले, “मागील सहा वर्षांप्रमाणेच पुढेही सर्वसमावेशक विकास, नागरिकांच्या गरजांना प्राधान्य आणि समस्यांवरील तातडीच्या उपाययोजनांसाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत राहीन.” ते पुढे म्हणाले की, उदगीर–जळकोटचा विकास हा त्यांचा ‘मुख्य ध्यास’ असून मतदारांनी दाखविलेला विश्वास हीच त्यांची “सर्वात मोठी शक्ती” आहे.
मतदारसंघात विकासाची गती कायम गेल्या काही वर्षांत मतदारसंघात रस्ते, पाणीपुरवठा, कृषी सुविधा, आरोग्य सेवेचे मजबुतीकरण, शिक्षण क्षेत्रातील उपक्रम आणि विविध पायाभूत प्रकल्प राबवण्यात आले. आगामी काळात यापेक्षा अधिक व्यापक प्रमाणावर विकासाचा रोडमॅप राबवण्याचे संकेत आमदारांनी दिले.

Post a Comment
0 Comments