अंबादास करकरे
मुरुड (ता. लातूर) : मुरुड पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरुवारी दुपारी टाकळगाव शेजारील पत्र्याच्या शेडवर टाकलेल्या धाडीत तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या चार जणांना रंगेहात पकडले असून पाच जण पोलिसांची चाहूल लागताच पळून गेले. या कारवाईत जुगार साहित्य, रोख रक्कम, मोटारसायकली आणि मोबाईल फोन असा एकूण ₹१,३७,१००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. २० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता, टाकळगाव (ता.जि. लातूर) येथील बालासाहेब नारायण जाधव यांच्या रस्त्यालगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये काही व्यक्ती तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस शिपाई शिवाजी भगवान पाटील (वय ३९) यांना मिळाली. त्यानुसार मुरुड पोलिसांनी तात्काळ पथक रवाना केले.
पथकाने छापा टाकला असता आरोपी १ ते ४ हे मोठ्या रकमेवर तिरट जुगार खेळताना व खेळवीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेत जुगार साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली. तर आरोपी क्रमांक ५ ते ८ हे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. एक आरोपी (क्रमांक ९) याचाही शोध घेतला जात आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी गौसोद्दीन मैनुद्दीन तांबोळी (४१ वर्षे, रा. पिंपळगाव आंबा, ता. लातूर) विनोद अर्जुन देवणे (४९ वर्षे, रा. टाकळगाव, ता. लातूर) सुनील बाबुराव पवार (५५ वर्षे, रा. देवळा, ता. आंबेजोगाई, जि. बीड) बिरू तुळजीराम चौरे (५५ वर्षे, रा. देवळा, ता. आंबेजोगाई, जि. बीड) फरार आरोपी बालाजी नारायण जाधव सुदाम शिंदे, राजाभाऊ शंकर देवणे, संजय शिंदे (वरील चारही आरोपी रा. टाकळगाव, ता. जि. लातूर) बाळासाहेब सुरवसे, रा. सारसा, ता. जि. लातूर
जप्त मुद्देमाल कारवाईत खालीलप्रमाणे मुद्देमाल हस्तगत :जुगार साहित्य रोख रक्कम दोन मोटारसायकली तीन मोबाईल फोनएकूण किंमत : ₹१,३७,१००/- प्रकरणी मुरुड पोलिसांनी गु.र. नं. ३७७/२५ कलम १२(अ), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. कारवाई पोलिस निरीक्षक उजगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पो.शि. शिवाजी भगवान पाटील यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि. आर. जे. चव्हाण करत आहेत. भागात वाढत चाललेल्या तिरट जुगाराच्या अवैध धंद्यावर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली असून मुरुड पोलिसांची ही धाड त्याच मोहिमेचा एक भाग असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Post a Comment
0 Comments