Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या अल्पसंख्यांक विभागाची संघटन मजबूत करण्यासाठी लातूरात बैठक — प्रदेशाध्यक्ष अफजल फारूक यांचे मार्गदर्शन


अंबादास करकरे 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या अल्पसंख्यांक विभागाची संघटना मजबूत करण्यासाठी आज लातूर येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. अफजल फारूक यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली. मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यात अल्पसंख्यांक विभाग अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा दौरा आयोजित करण्यात आला होता.

शहरातील जय क्रांती कॉलेज येथे ही आढावा बैठक घेण्यात आली. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्त्यांची संख्या कशी वाढवायची, संघटनात्मक रचना कशी मजबूत करायची आणि जास्तीत जास्त अल्पसंख्यांक लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी कोणत्या रणनीती अवलंबायच्या याबाबत प्रदेशाध्यक्ष अफजल फारूक यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

बैठक लातूर शहर जिल्हाध्यक्ष राजाजी मणियार यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष इरफान शेख यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली. बैठकीत लातूर जिल्ह्यातील अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

बैठकीस एडवोकेट आर. झेड. हाश्मी, शकील अहमद, रहेमान शेख, प्राध्यापक प्रशांत घार, एडवोकेट इरफान शेख, रघुनाथ मडने, फोरोज सय्यद, समीर शेख, बसवेश्वर आप्पाजी, फेरोज पठाण, बरकत शेख, इब्राहिम शेख, जमील नाना, खंडू लोंढे, मोईन शेख, जाकेर तांबोळी, शादाब शेख, हमीद शेख, शादात खान, वसिम पठाण, अकलाक शेख, अजिम शेख, अकरम पठाण यांसह लातूरातील अल्पसंख्यांक विभागाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


या बैठकीमुळे लातूर जिल्ह्यातील अल्पसंख्यांक विभागाच्या संघटन कार्याला नवीन वेग मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments