Type Here to Get Search Results !

लातूर शहरात दामिनी पथकाच्या वेगवान आणि संवेदनशील प्रतिसादामुळे एका कॉलेज तरुणीवरील गंभीर प्रकार टळल्याची घटना



लातूर/अंबादास करकरे 

दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी घडली. एका सतर्क नागरिकाने दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीमुळे तात्काळ मदत पोहोचून मुलीची सुटका करण्यात आली. सकाळी अंदाजे १०.३० वाजता शहरात पेट्रोलिंग करत असलेल्या दामिनी पथकास एका नागरिकाने फोन करून, एका कॉलेजची मुलगी रडत असल्याचे आणि एका तरुणाने तिला चाकूने हात कापण्याची धमकी देत एका हॉटेलमध्ये नेल्याची माहिती दिली. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दामिनी पथकाने फक्त ७-८ मिनिटांत घटनास्थळी धाव घेऊन मुलगी आणि आरोपीला ताब्यात घेतले व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले.

शिवाजीनगर पोलिसांनी घेतलेल्या जबाबात पीडित मुलीने सांगितले की आरोपी विशाल वाळासाहेब केकान (रा. केकानबाडी, ता. केज, जि. बीड) हा गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅप, फोन कॉल आणि मेसेजद्वारे तिला सतत त्रास देत होता. त्या दिवशीही आरोपीने “मी जीव देतो” असे म्हणत तिला भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करून अक्षय स्विमिंग पूलजवळ भेटण्यास भाग पाडले. त्यानंतर “मी रूम बुक केली आहे, माझ्या सोबत चल, नाहीतर मी हात कापतो आणि तुझे नाव घेतो” अशी धमकी देत शिवीगाळ करत तीला जबरदस्तीने हॉटेलकडे घेऊन जात होता.

तपशीलवार जबाब नोंदवल्यानंतर आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 445/2026 अन्वये कलम 74, 75, 78(2), 79, 352, 351(2) बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सुप्रिया केंद्रे करत आहेत.

प्रकरणात रस्त्यावरून जाणाऱ्या एका सतर्क नागरिकाने केलेल्या वेळेवर फोनमुळे मोठा अनर्थ टळला. लातूर शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही रोडरोमिओ, टवाळखोर किंवा त्रास देणाऱ्या व्यक्तीची माहिती तात्काळ ‘दामिनी पथक’ क्रमांक 8830115409 वर द्यावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल.

ही कारवाई पोलीस अधिक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधिक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, पोनि/अभिषेक शिंदे आणि दामिनी पथकातील पोलीस अंमलदार प्रशांत नागरगोजे, भाग्यश्री झोडपे आणि पल्लवी चिलगर यांनी

Post a Comment

0 Comments