अंबादास करकरे
लातूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या बियर बार, देशी दारू दुकाने फोडून दारू चोरी तसेच चारचाकी-दुचाकी वाहन चोरीच्या घटनांच्या मालिका अखेर थांबल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना जेरबंद करत तब्बल ४६ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत जिल्ह्यातील १५ गुन्हे उघडकीस आले असून एका तिसऱ्या साथीदाराचे नावही समोर आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने केली. गुप्त बातमीवरून पथकाची धडक कारवाई दिनांक 17 नोव्हेंबर रोजी पथकाला मौजे बोरोळ येथील एका शेतात दोन ट्रॅक्टर आणि दोन मोटारसायकलींसह दोन संशयित इसम थांबले असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून खालील दोघांना ताब्यात घेतले—
1. प्रदीप विष्णू यशवंते (वय 26), रा. देवळा, ता. अंबाजोगाई, जि. बीड 2. शाम ओमकार जमादार (वय 25), रा. मोरंबी, ता. भालकी, जि. बिदर, कर्नाटक आरोपींसह दोन ट्रॅक्टर, दोन मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या. पंचासमक्ष अंगझडती घेतली असता ₹5,20,000/- रोख रक्कम आढळून आली. आरोपींची कबुली – वाहने, दारू, सोयाबीन चोरी चौकशीत आरोपींनी सांगितले की त्यांनी तिसऱ्या साथीदार 3) प्रदीप उर्फ लालु माधव कांबळे (वय 24), रा. बसपुर, ता. निलंगा, जि. लातूर) याच्यासोबत मिळून मोठ्या प्रमाणात चोरीचे गुन्हे केले आहेत. त्यात ०५ ट्रॅक्टर चोरी ०१ पिकअप वाहन चोरी ०२ स्कॉर्पिओ गाड्या चोरी ०४ बियर बार / बियर शॉपी / देशी दारू दुकान फोडून दारू चोरी एका शेतातील सोयाबीन चोरी ०२ मोटारसायकली चोरी असा मोठा गुन्हेगारी इतिहास उघड झाला. चोरी केलेली स्कॉर्पिओ, दारू वरील दुकाने फोडून केलेली दारूची चोरी आणि विक्रीतून मिळालेली ₹5,20,000/- रोकड, तसेच सर्व वाहने ताब्यात घेण्यात आली.
उघड झालेले १५ गुन्हे आरोपींच्या कबुली व मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे खालील पोलीस ठाण्यांतील १५ गुन्ह्यांचा उलगडा झाला. लातूर ग्रामीण, रेणापूर, गातेगाव, किल्लारी, उदगीर ग्रामीण, मुरुड, एमआयडीसी, भादा, आनंदनगर (धाराशिव), देवणी या पोलीस ठाण्यांमधील विविध कलमांनुसार दाखल असलेले गंभीर गुन्हे आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले.
एकूण जप्त मुद्देमाल रोख रक्कम – ₹5,20,000/-चोरीस गेलेले ट्रॅक्टर, मोटारसायकली, स्कारपिओ, पिकअप दारू, सोयाबीन इत्यादी चोरीचा मुद्देमाल एकूण ₹46,45,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पथकाचे कौतुकास्पद कामगिरी ही कारवाई खालील पथकाने केली अ.पोल.नि. सदानंद भुजबळ,पोल.उपनिरीक्षक – राजेश घाडगे, प्रमोद देशमुख,
सपोउपनि – सर्जेराव जगताप,पोलीस कर्मचारी – युवराज गिरी, संजय कांबळे, मोहन सुरवसे, राजेश कंचे, सूर्यकांत कलमे, रियाज सौदागर, साहेबराव हाके, तुराब पठाण, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठेवाड, मनोज खोसे, गोविंद भोसले, गणेश साठे, शैलेश सुडे, प्रदीप चोपणे, श्रीरंग जांभळे,
महिला पोलीस – अंजली गायकवाड
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण कारवाई करून मोठ्या प्रमाणातील गुन्हे उघडकीस आणले.

Post a Comment
0 Comments