Type Here to Get Search Results !

लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त लातूरमध्ये पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पांजली.



अंबादास करकरे 

लातूर, ग्रामीण जनतेच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर झटणारे, सामाजिक न्यायाची ठाम भूमिका मांडणारे आणि सर्वसामान्यांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त लातूर येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या त्यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमात भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष तथा युवा नेते मा. ऋषिकेशदादा रमेशआप्पा कराड यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी मुंडे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले.

लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारण्यात आलेला हा पुतळा महाराष्ट्रातील शासकीय जागेत उभारण्यात आलेल्या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या पहिल्या भव्य पूर्णाकृती पुतळ्यांपैकी एक मानला जात आहे. भाजपाचे नेते आमदार रमेशआप्पा कराड यांच्या पुढाकारातून हा पुतळा उभारण्यात आला असून, नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.

१२ डिसेंबर हा लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा जन्मदिन. या दिनाचे औचित्य साधून युवा नेते ऋषिकेशदादा कराड यांनी पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुंडे साहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी मुंडे साहेबांचे ग्रामीण विकास, शेतकरी, कष्टकरी व वंचित समाजासाठी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास भाजपाचे डॉ. बाबासाहेब घुले, प्रताप पाटील, विजयकुमार मलवाडे, सुरज शिंदे, भैरवनाथ पिसाळ, बाबासाहेब भिसे, शामसुंदर वाघमारे, सुकेश भंडारे, अमर चव्हाण, आदीनाथ मुळे, शहानुर बागवान, ललिता कांबळे, शिलाताई आचार्य, धनराज शिंदे, अशोक सावंत, शंकर चव्हाण, ज्ञानेश्वर जुगल, राम भताने, भागवत गिते, शुभम खोसे, सुरेश सूर्यवंशी, नानासाहेब कसपटे, अंकुश गणगे, बाबासाहेब देवकर, पिंटू डोंगरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला असून, लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.


Post a Comment

0 Comments