Type Here to Get Search Results !

देवणी तालुक्यातील कुष्ठरोगी व निराधारांना थांबलेले अनुदान त्वरित द्यावे – निवेदन


देवणी/अंबादास करकरे 

उपेक्षित लोककलावंत मजूर व निराधाराची पुनर्वसन संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देवणी तालुक्यातील कुष्ठरोगी व निराधार लाभार्थ्यांना थांबलेले शासकीय अनुदान त्वरित वितरित करण्यात यावे, या मागणीसाठी देवणी तालुक्याचे नायब तहसीलदार श्री. एल. पी. कांबळे साहेब यांच्यामार्फत माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी संघटनेचे अपेक्षितांचे नेते वसंत बी. बी. नवरे टाकळीकर, जिल्हाध्यक्ष गोकुळ दंतराव, सामाजिक कार्यकर्ते दंडे तसेच लाभार्थी लहू ज्ञानोबा कांबळे, रजिया बी, मौसम आदी उपस्थित होते. संबंधित लाभार्थ्यांना गेल्या काही काळापासून अनुदान मिळत नसल्याने त्यांची मोठी आर्थिक अडचण होत असून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments