Type Here to Get Search Results !

*निवडणूक जिंकली ती खऱ्या अर्थाने लातूरच्या सुजाण मतदारांनीच!*


लातूरची जनता जेवढी शांत, संयमी, सहनशील आहे ती तेवढीच विचारी आणि संवेदनशील सुद्धा आहे हे या निवडणुकीतील निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. लातूरकर जनतेच्या मनाचा तळ गाठणे एवढं सोपं नाही हे सत्य विसरता कामा नये. आम्ही संवादावर विश्वास ठेवतो संघर्षावर नाही यावरही शिक्कामोर्तब करणारे निकाल लागले. 

निवडणूक काळातील किळसवाणे वक्तव्ये, सत्तेसाठीचा हव्यास, संधीसाधू प्रवृत्ती आणि त्यातून घेतलेले काही निर्णय, राजकीय संघर्षातून शहरात घडलेल्या अप्रिय घटना लातूरकरांच्या पचनी पडल्या नाहीत. आम्ही राजकीय पक्षांच्या पुढे जाऊन विचार करतो हे या निकालाने राज्याला दाखवून दिले. राजकरणात वैचारिक मतभेद असावेत पण या सत्तासंघर्षात मुजोरी, मग्रुरीला थारा नाही हे ही स्पष्ट झाले. राजकारणातील सुसंस्कृतपणा जपणे ही प्रामुख्याने राजकीय नेत्यांची जबाबदारी आहे मात्र दुर्दैवाने ही धुरा लातूरच्या सुज्ञ मतदारांनी आपल्या खांद्यावर घेतली. लातूरच्या संस्कृतीला गालबोट लागेल अशा राजकारणापासून दूर राहण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न राज्याच्या दुषित होत चाललेल्या उग्र राजकारणाला नवी दिशा देणारा आहे यात शंका नाही. लोकशाहीत मतदारच खरा राजा असतो हेच अंतिम सत्य आणि म्हणून निवडणूक जिंकली ती लातूरच्या सुजाण नागरिकांनी.

जय हिंद!

सतीश तांदळे 

माझं लातूर परिवार

Post a Comment

0 Comments